सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या युजर्ससाठी चांगली बातमी आहे. कंपनीने आपल्या 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये बदल केला आहे. आता या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळेल. हा प्लॅन वापरणाऱ्यांना आता मुंबई आणि दिल्लीच्या MTNL नेटवर्कसह देशभरात कुठेही अनलिमिटेड कॉलिंग करता येईल. बीएसएनएलचा हा प्लॅन रिलायन्स जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनला तगडी टक्कर देऊ शकतो. जाणून घेऊया सविस्तर :

बीएसएनएलचा 199 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन :
बीएसएनएलच्या 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये आता देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये 100 फ्री एसएमएसचाही फायदा मिळतो. तसेच, 25जीबी डेटाही वापरण्यास मिळतो. या डेटासाठी 75जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरचा फायदा मिळेल. बीएसएनएलचा हा प्लॅन 1 फेब्रुवारीपासून लागू झाला आहे.

जिओचा 199 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन :
या प्लॅनद्वारे बीएसएनएल कंपनी जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनला तगडी टक्कर देऊ शकते. जिओच्या 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि फ्री एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि सावनसोबत अनलिमिटेड कॉलरट्यून्सचा फायदा मिळतो. जिओच्या या प्लॅनमध्येही एकूण 25जीबी डेटा दिला जातो. पण या प्लॅनमध्ये बीएसएनएलप्रमाणे डेटा रोलओव्हरचा पर्याय मिळत नाही.