News Flash

BSNL च्या ‘पॉप्युलर’ प्लॅनमध्ये 71 दिवस Extra व्हॅलिडिटी, दररोज मिळणार 3GB डेटाही

Reliance Jio च्या प्लॅनला बीएसएनएलची टक्कर

(सांकेतिक छायाचित्र)

BSNL ग्राहकांसाठी चांगले वृत्त आहे. कंपनीने आपल्या 1,999 रुपयांच्या वार्षिक प्रिपेड रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केला असून आता या प्लॅनमध्ये कंपनी 71 दिवसांची अतिरिक्त वैधता देत आहे. बीएसएनएलने हा प्लॅन Reliance Jio च्या 2,121 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी आणला आहे.

28 फेब्रुवारीपर्यंत बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये 436 दिवस आणि 1 मार्च ते 31 मार्चदरम्यान या प्लॅनमध्ये 425 दिवसांची वैधता दिली जात आहे. प्रमोशनल ऑफरअंतर्गत कंपनीकडून अतिरिक्त वैधता दिली जात आहे. पहिल्या प्रमोशनल ऑफरमध्ये युजर्सना 71 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. पण, यासाठी ग्राहकांना त्यांचा बीएसएनएल नंबर 28 फेब्रुवारीपर्यंत रिचार्ज करणे आवश्यक असेल. तर, दुसऱ्या प्रमोशनल ऑफरअंतर्गत 1 मार्च ते 31 मार्चदरम्यान रिचार्ज केल्यास 60 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल.

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 3जीबी डेटाची ऑफर देत आहे. दररोज 100 फ्री एसएमएस आणि कॉलिंगसाठी दरदिवशी 250 मिनिटे मिळतात. याशिवाय बीएसएनएल टीव्ही आणि बीएसएनएल ट्यून्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या मोफत सुविधा केवळ 365 दिवसांसाठीच वैध असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 11:57 am

Web Title: bsnl rs 1999 prepaid plan 71 day additional validity offer extended and one more promotional offer announced know all details sas 89
Next Stories
1 देशातला पहिला 5G स्मार्टफोन आज होणार लाँच, ‘इतकी’ असणार किंमत?
2 BS6 इंजिनसह आली नवीन Honda Shine , मायलेज वाढला; किंमत किती?
3 विदेशात फिरायला जाताय? मग आरोग्याच्या घ्या अशी काळजी
Just Now!
X