सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रिपेड प्लॅन आणलाय. BSNL ने 599 रुपयांमध्ये 84 दिवस वैधता असलेला एक खास प्लॅन लाँच केला आहे.
बीएसएनएलच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 5GB डेटा मिळतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे, म्हणजेच एकूण 420GB डेटा ग्राहकांना मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. तसेच, दररोज 100 SMS ची सुविधाही मिळेल. याव्यतिरिक्त BSNL च्या नवीन प्लॅनमध्ये Zing app चं फ्री सबस्क्रिप्शनही मिळतं. करोना काळात वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी हा प्लॅन उपयोगी ठरु शकतो.
दरम्यान, बीएसएनएलसोबतची सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे 4जी सेवा. कंपनीची 4जी सेवा सध्या काही शहरांमध्येच सुरू झाली आहे. त्यामुळे हा प्लॅन घेऊनही बहुतांश ठिकाणी युजर्सना 2G/3G सेवाच वापरता येते. पण, ज्या शहरांमध्ये बीएसएनएलची 4जी सेवा सुरू झालीये तिथे अन्य टेलिकॉम कंपन्यांच्या 600 रुपयांपेक्षा कमी प्लॅनच्या तुलनेत बीएसएनएलचा प्रिपेड प्लॅन बेस्ट आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2021 4:07 pm