सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या BSNL Sixer plan अर्थात 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. आतापर्यंत या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळायचा. पण, आता कंपनीने त्यात वाढ केली असून अतिरिक्त डेटा ऑफर अंतर्गत दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे.

666 रुपयांच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा ऑफर अंतर्गत दररोज 3 जीबी डेटा ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. 31 डिसेंबरनंतर मात्र ग्राहकांना पुन्हा 2जीबी प्रतिदिन डेटा मिळेल. यानुसार, 134 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज तीन जीबी डेटाशिवाय ग्राहकांना मोफत व्हॉइस कॉलिंग (२५० मिनिट रोज लिमिट) आणि 100 एसएमएस दररोज मिळतील.

एकाच वर्षात चौथ्यांदा बदल –
-याच वर्षात कंपनीने 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये चौथ्यांदा बदल केला
-2019 च्या सुरुवातीला 129 दिवसांचा हा प्लॅन कमी करून 122 दिवसांचा केला
-त्यानंतर काही महिन्यांनी या प्लॅनची वैधता 134 दिवस केली
-यानंतर काही दिवसांपूर्वी MTNL वर मोफत व्हाइस कॉलिंगची सुविधा देण्यात आली
-आता चौथ्यांदा डेटामध्ये बदल करण्यात आला आहे.