सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या नव्या ब्रॉडबँड प्लानची घोषणा केली आहे. Superstar 300 असं या प्लानचं नाव असून या ‘फायबर टू होम प्लान’चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये यामध्ये हॉटस्टार प्रीमियमचं सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. क्रिकेट विश्वचषकानिमित्त बीएसएनएलने ही ऑफर आणली आहे, या ऑफरमुळे बीएसएनएलच्या क्रिकेटप्रेमी ग्राहकांना हॉटस्टारवर मोफत सामने पाहता येतील.  यावर्षाच्या सुरूवातीलाही बीएसएनएलने आपल्या Bharat Fiber च्या निवडक ग्राहकांसाठी Amazon Prime चं सब्सक्रिप्शन मोफत देण्याचं जाहीर केलं होतं.

749 रुपये इतकी या प्लानची किंमत आहे. यामध्ये युजर्सना 50 Mbpsच्या स्पीडने 300जीबी इंटरनेट डेटा वापरण्यास मिळेल. इंटरनेट मर्यादा संपल्यानंतर ऑप्टिकल फायबरच्या ग्राहकांसाठी इंटरनेट स्पीड 2Mbps असेल. देशभरात सर्वत्र ही ऑफर लागू असणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहक ऑनलाइन रिक्वेस्ट करु शकतात किंवा अधिक माहितीसाठी ग्राहक 18003451500 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करु शकतात. टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमुळे प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर आणत आहेत.