News Flash

BSNLची नवीन STV सीरीज लाँच, 19 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग

जास्त कॉलिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन STV सीरिज लाँच...

(संग्रहित छायाचित्र)

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवे प्लॅन आणत आहे. नुकताच कंपनीने 100Mbps स्पीडसह 1.4 टीबी डेटा असलेला प्लॅन लाँच केला. तर, आता कंपनीने जास्त  कॉलिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी खास ‘स्पेशल टॅरिफ व्हाउचर’ (STV) सीरिज लाँच केली आहे. याची सुरूवात 19 रुपयांपासून होते. ग्राहकांना या सीरिजच्या सर्व प्लॅनमध्ये केवळ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. सध्या ही सीरिज तामिळनाडू सर्कलमध्येच उपलब्ध झाली आहे. पण लवकरच देशातील अन्य सर्कलमध्येही उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Voice Only STV  19 रुपये :-
बीएसएनएलच्या Voice Only श्रेणीमधील हा सर्वात स्वस्त टॅरिफ प्लॅन आहे. 19 रुपयांच्या या व्हाउचरमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगच फायदा मिळेल. पण कॉलिंग पूर्ण मोफत नाहीये, तुम्हाला 20 पैसे प्रति मिनिटनुसार कॉलसाठी पैसे आकारले जातील. ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर कॉल करु शकतात. या व्हाउचरची वैधता 30 दिवस आहे.

Voice Only STV 99 रुपये :-
बीएसएनएलच्या या 99 रुपयांच्या व्हाउचरवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. पण, या व्हाउचरला दररोज 250 मिनिटांचे लिमिट आहे. याशिवाय प्रीमियम नंबर आणि इंटरनॅशनल नंबरवर कॉल केल्यास दर आकारला जाईल. या व्हाउचरची वैधता 22 दिवस आहे.

Voice Only STV 135 रुपये :-
135 रुपयांच्या या व्हाउचरमध्ये कॉलिंगसाठी दररोज 300 मिनिटे मिळतील. 300 मिनिटे संपल्यानंतर बेस टॅरिफप्रमाणे दर आकारला जाईल. या व्हाउचरची वैधता 24 दिवस आहे.

Voice Only STV  209 रुपये :-
209 रुपयांच्या व्हाउचरची वैधता 90 दिवस आहे. पण यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळत नाही. याद्वारे अकाउंटमध्ये 25 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. यात कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2 सेकंदामागे 1 पैसा आकारला जातो.

Voice Only STV  319 रुपये :-
319 रुपयांचं व्हाउचर या सीरिजचं सर्वात महागडं व्हाउचर आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. याची वैधता 75 दिवस आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 1:03 pm

Web Title: bsnl voice only stvs starts at just rs 19 it offers unlimited calling benefit sas 89
Next Stories
1 शिक्षणासाठी, वाचनासाठी मोफत ऑनलाइन पुस्तकांची लायब्ररी
2 Realme च्या ‘बजेट’ स्मार्टफोनचा ‘सेल’, कमी किंमतीत मिळतील शानदार फीचर्स
3 OnePlus 8 Pro 5G चा आज पहिलाच ‘सेल’, जाणून घ्या ऑफर आणि किंमत
Just Now!
X