News Flash

कोणते दूध जास्त पोषक? गायीचे की म्हशीचे?

आहाराच्या दृष्टीने महत्त्वाचे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दूध म्हणजे पूर्णान्न असे आपण नेहमी ऐकतो. लहान मूल तर जन्मल्यानंतर पुढचे जवळपास दीड ते दोन वर्षे दूधावरच असते. या दोन्ही दुधांमध्ये आपापले काही विशेष गुणधर्म आहेत. दूधामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे दुधाला आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नक्की कोणते दूध चांगले असा प्रश्न अनेकदा उद्भवतो. पण म्हशीचे दूध हे शरीरातील ताकद वाढण्याबरोबरच स्नायूंची ताकदही वाढवते असे अविनव वर्मा यांचे म्हणणे आहे. पाहूयात या दोन्हीमंध्ये नेमका काय फरक असतो आणि त्यातील कोणत्या घटकांचा शरीराला फायदा होतो.

गाय आणि म्हशीच्या दुधामधील फरक

१. गायीच्या दुधामध्ये ४ टक्के स्निग्धांश असतो तर म्हशीच्या दुधामध्ये हाच स्निग्धांश ६ टक्के इतका असतो.

२. गायीच्या दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण ३ टक्के असते तर म्हशीच्या दुधात ते ४ टक्के असते.

३. म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा कॅल्शियमही जास्त असते.

तुम्हाला स्नायूंची बळकटी मिळवायची असेल तर म्हशीचे दूध केव्हाही जास्त चांगले. मात्र तुम्हाला वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर गायीचे दूध हा उत्तम पर्याय आहे. ज्यांना अन्नपचनाशी निगडीत काही तक्रारी आहेत त्यांच्यासाठीही गायीचे दूध चांगले आहे कारण गायीचे दूध पचणे सोपे असते. त्यामुळे म्हशीच्या दुधाचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत ज्याचा तुम्ही आहारात समावेश केल्यास तुम्हाला निश्चितच फायदा होईल.

स्नायूंसाठी म्हशीचे दूध का चांगले?

१. म्हशीचे दूध कुठेही सहज उपलब्ध होते.

२. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण गायीच्या दुधापेक्षा निश्चित जास्त असते.

३. यामध्ये असणारे ३४ टक्के अनसॅच्युरेटेड फॅटस शरीराच्या वाढीसाठी अत्यावश्यक असतात.

४. म्हशीच्या दुधाची चवही गायीच्या दुधापेक्षा जास्त चांगली असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 3:46 pm

Web Title: buffalo milk is better choice for muscle building know the reason
Next Stories
1 व्हॉटसअॅप ग्रुप अॅडमिनला मिळणार ‘हे’ नवीन अधिकार
2 ‘असा’ मिळवा मोबाईलमधून डिलीट झालेला डेटा
3 ‘अशी’ घ्या तुमच्या कपड्यांची  काळजी
Just Now!
X