06 August 2020

News Flash

ऑडी आणि मर्सिडिझपेक्षा महागडी म्हैस!

गावातील लोक या म्हशीला 'काळे सोने' म्हणून संबोधतात.

रामफलच्या या म्हशीची किंमत ऑडी आणि मर्सिडिझ गाडीच्या किंमतीपेक्षा जास्त आहे.

हरियाणामधील भिवानी येथील गुजरानी गावातील एक म्हैस सध्या चांगलीच चर्चेत आहे. म्हशीचा मालक रामफल हा देखील प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. याचं कारण आहे, रामफलच्या या म्हशीची किंमत ऑडी आणि मर्सिडिझ गाडीच्या किंमतीपेक्षा जास्त आहे. ५६ लाख इतकी बोली लावण्यात आलेली ही म्हैस दिवसाला अनेक बादल्या दूध देते. गावातील लोक या म्हशीला ‘काळे सोने’ म्हणून संबोधतात. मुऱ्हा जातीची ही म्हैस सर्वसाधारण म्हशींपेक्षा जास्त दूध देते. भरपूर मात्रेमध्ये दूध देणाऱ्या या म्हशीने गावात आयोजित करण्यात आलेल्या जास्त दूध देण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. जास्त दूध देण्याच्या गुणामुळे मुऱ्हा जातीच्या म्हशी शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या ठरतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2016 6:51 pm

Web Title: buffalo price 56 lacks in haryana
टॅग Haryana,Milk
Next Stories
1 गर्भावस्थेत मासे सेवन केल्यास बालकांच्या मेंदूचा योग्य विकास
2 रेल्वेमध्ये  मधुमेहग्रस्तांसाठी  विशेष आहार?
3 ‘फेसुबक’वर फक्त २०० खरेखुरे मित्र असू शकतात!
Just Now!
X