26 November 2020

News Flash

6,000mAh बॅटरीचा Poco X3 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, मिळतील शानदार ऑफर्स

6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी, 64MP चा मुख्य कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 732जी ऑक्टा-कोर प्रोसेसर, असे शानदार फीचर्स

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर ‘पोको’ कंपनीचा Poco X3 हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरु शकतो. सध्या हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर शानदार ऑफरसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली असून फास्ट चार्जिंग फिचरही आहे. यासोबतच फोनमध्ये एकूण पाच कॅमेऱ्यांचा सपोर्ट देण्यात आला आहे.  6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी, 64MP चा मुख्य कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 732जी ऑक्टा-कोर प्रोसेसर, असे शानदार फीचर्स या फोनमध्ये आहेत.

Poco X3 ची किंमत आणि ऑफर :-
कोबाल्ट ब्लू आणि शॅडो ग्रे अशा दोन रंगाच्या पर्यायात हा फोन उपलब्ध आहे. 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज ( 16 हजार 999 रुपये), 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज (18 हजार 499 रुपये) आणि 8जीबी रॅम+128जीबी स्टोरेज (19 हजार 999 रुपये) अशा तीन व्हेरिअंटमध्ये हा फोन खरेदी करता येईल. फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरुन फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास पाच टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी करणाऱ्यांनाही पाच टक्के डिस्काउंटस मिळेल. तसेच हा फोन 2,056 रुपये दरमहानो-कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करता येईल. याव्यतिरिक्त हा फोन खरेदी करताना एक्स्चेंज ऑफरनुसार १४ हजार ५०० रुपांपर्यंत सवलतही मिळू शकते.

स्पेसिफिकेशन्स :-
कोबाल्ट ब्लू आणि शॅडो ग्रे अशा दोन रंगाच्या पर्यायात हा फोन उपलब्ध आहे. 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज, 6जीबी रॅम+128जीबी स्टोरेज आणि 8जीबी रॅम+128जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरिअंटमध्ये हा फोन खरेदी करता येईल. काही दिवसांपूर्वीच पोको कंपनीने आपल्या Poco X3 स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेटही आणलं आहे. या नव्या अपडेटनंतर Poco X3 चे युजर्स आपल्या स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग करु शकणार आहेत. आतापर्यंत Poco X3 मध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा नव्हती, त्यामुळे युजर्सकडे कॉल रेकॉर्ड करण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. पण आता नव्या अपडेटनंतर युजर्सची ही समस्या सुटणार आहे. Poco X3 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्लेसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. 8जीबीपर्यंत रॅमची क्षमता असलेल्या या फोनमध्ये प्रोसेसरसाठी स्नॅपड्रॅगन 732G SoC चिपसेट आहे. फोटॉग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो शूटर असा सेटअप आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तसेच, फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये असून 128जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मेमरी आहे. आवश्यकता असल्यास मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 1:49 pm

Web Title: buy poco x3 with 6000mah battery at low price know attractive offers and price sas 89
Next Stories
1 लक्षणं दिसण्याआधीच करोनाचा संसर्ग ओळखण्यास मदतशीर ठरु शकतं स्मार्टवॉच!
2 Jio चे जबरदस्त रिचार्ज प्लॅन, दररोज मिळतो 3GB डेटा; जाणून घ्या डिटेल्स
3 स्वस्त झाला लेटेस्ट ‘बजेट’ स्मार्टफोन, 5000mAh च्या दमदार बॅटरीसह एकूण चार कॅमेरे
Just Now!
X