उंटीणीचे दूध हे मधुमेह, स्वमग्नता, संधिवात यावर गुणकारी असते, असा दावा नॅशनल रीसर्च सेंटर ऑन कॅमल या बिकानेर येथील संस्थेचे संचालक डॉ. एन. व्ही. पाटील यांनी केला आहे.

त्यांनी सांगितले, की उंटीणीच्या दुधात प्रथिने, जीवनसत्त्वे व अँटी ऑक्सिडंट अधिक असतात, त्यामुळे ते गुणकारी ठरते.

गाय किंवा बकरीच्या दुधापेक्षा उंटीणीच्या दुधाची चव वेगळी असते. त्याचा वापर औषधासाठी केला जातो. त्यामुळे या दुधाचा खप वाढला आहे.

२०१६-१७ मध्ये संस्थेकडून स्वमग्नता व मतिमंद अशा १०८ मुलांवर उंटीणीच्या दुधाचा प्रयोग करण्यात आला असता त्यांच्यात ३०.२२ टक्के सुधारणा दिसून आली. उपचारापूर्वीच्या मुलांच्या ७५ गुणांकाच्या मुलात ४३ ते ५८ टक्के सुधारणा दिसून आली. तर ९० गुणांक असलेल्या मुलांमध्ये ३४ टक्के सुधारणा दिसून आली. देशात उंटांची संख्या ४ लाख असून त्यातील ८२ टक्के राजस्थानात आहेत. त्यांची संख्या कमी होत चालली आहे.

उंटीणीचे दूध गुणकारी असूनही त्याची निर्यात करण्यात अडचणी आहेत, शिवाय अमूल कंपनीशी याबाबत चर्चा सुरू आहे. उंटीणीच्या दुधातून २०१७-१८ मध्ये ११.९८ लाखांचा महसूल मिळाला होता तो २०१३-१४ मध्ये ३.३७ लाख होता. उंटीणीच्या कच्च्या व पाश्चारीकरण केलेल्या दुधाचा खप २०१३-१४ पासून अनुक्रमे ७९ टक्के व १११ टक्के वाढला आहे. उंटीणीच्या दुधाला देशातून मागणी वाढत आहे. २०१३-१४ मध्ये ५०८८ लिटर दूध विकले गेले तर २०१७-१८ मध्ये ९१२४ लिटर दूध विकले गेले होते.c