26 February 2021

News Flash

फ्लूवर औषध शोधण्यात वैज्ञानिकांना यश

कॅनडातील वैज्ञानिकांनी फ्लूवर संशोधन करून नवीन औषध शोधून काढले आहे. संशोधकांच्या मते त्यांनी फ्लूच्या तीन प्रकारच्या..

| June 7, 2015 03:58 am

कॅनडातील वैज्ञानिकांनी फ्लूवर संशोधन करून नवीन औषध शोधून काढले आहे. संशोधकांच्या मते त्यांनी फ्लूच्या तीन प्रकारच्या विषाणूंवर संशोधन केले असून, हे औषध उंदरांमध्ये दोन प्रकारांत तर उंदरासह इतर प्राण्यांत तीन प्रकारच्या विषाणूंवर प्रभावी ठरले आहे.
फ्लू होण्यास कारण ठरणाऱ्या विषाणूला लक्ष्य करण्याऐवजी हे औषध रक्तवाहिन्यांमधील द्रव फुफ्फुसातील वायुकोशात गळणार नाही याची काळजी घेते. फ्लूने जे लोक मरतात ते वायुकोशात द्रव गेल्याने मरतात. कारण रक्तवाहिन्यातील द्रव वायुकोशात गळत असतो. नव्या औषधाचे नाव ‘व्हॅक्युलोटइड’ असे असून ते टोरांटो येथील सनब्रुक रुग्णालयातील संशोधकांनी तयार केले आहे. इन्फ्लुएंझाच्या अनेक विषाणूंवर हे औषध परिणामकारक आहे. त्यात स्वाइन फ्लू विषाणूचाही समावेश आहे. सेंट मायकेल रुग्णालयातील कीनन संशोधन केंद्राने या औषधाची चाचणी उंदरांवर घेतली असल्याचे संशोधक वॉरेन ली यांनी सांगितले. यात रक्तवाहित्यातील द्रव फुफ्फुसात जात नाही, तीन प्रकारच्या विषाणूंवर हा प्रयोग केला असता दोन विषाणूत तो यशस्वी झाला आहे.
औषधाशिवाय १०० टक्के  उंदीर मरण पावले तर औषध घेतल्यानंतर ८० टक्के उंदीर वाचले. संसर्गानंतर काही दिवसांनी हे औषध दिले तरी परिणाम होतो. हे औषध स्वतंत्र व अँटीव्हायरल औषधांबरोबर वापरता येते. त्यात प्रतिकारशक्तीवर काही परिणाम होत नाही, ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 3:58 am

Web Title: canadian researchers found a new drug for flu virus
Next Stories
1 भारतात प्राण्यांच्या १७६ नवीन प्रजातींचा शोध
2 ११००० बळी घेणारा इबोला परतण्याची शक्यता
3 ‘दोनशे वर्षांत सर्वच जण सायबोर्ग बनतील’
Just Now!
X