जपानची प्रसिद्ध कंपनी कॅनॉनने भारतीय बाजारात आपला पहिला फुल-फ्रेम मिररलेस कॅमेरा ‘ईओएस आर’ लॉन्च केला. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून या कॅमेऱ्याच्या विक्रीला सुरूवात होईल अशी माहिती कंपनीने दिली आहे. 30.3 मेगापिक्सलच्या या कॅमेऱ्याची किंमत 1,89,950 रुपये (फक्त बॉडी) इतकी आहे. तर, EOS R किट (RF24-105mm f/4L IS USM लेन्स)च्या सोबत या कॅमेऱ्याची किंमत 2,78,945 रुपये इतकी आहे. EOS R कॅमेऱ्यासोबत कंपनीने चार नवीन RF लेन्स, दोन सुपर टेलिफोटो लेन्स आणि एक प्राईम EF-M लॉन्च केले आहेत. नवीन EOS R सोबत EOS R इकोसिस्टमला पूर्ण करण्यासाठी चार वेगवेगळे RF माउंट अॅडप्टर्स सुद्धा सादर केले आहेत.
EOS R च्या स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 30.3 मेगापिक्सल फुल-फ्रेम CMOS सेंसर, कॅनॉन DIGIC 8 इमेज प्रोसेसर आणि 5,655 सेलेक्टेबल AF पॉइंट्स आहेत. या कॅमेऱ्याची ISO रेंज 100-40,000 पर्यंत आहे, आणि 8fps पर्यंत बर्स्ट शूटिंगचा सपोर्ट आहे. याशिवाय यामध्ये कंपनीची प्रसीद्ध ड्युअल पिक्सल AF सिस्टिम आहे. या कॅमेऱ्याने 30fps वर 4K पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगही करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या लेंसच्या किंमतींचा खुलासाही कंपनीने केला आहे-

RF24-105mm f/4L IS USM ची किंमत 88,995 रुपये,
RF50mm f/1.2L USM ची किंमत 1,85,995 रुपये,
RF28-70mm f/2L USM ची किंमत 2,42,995 रुपये,
RF35mm f/1.8 MACRO IS STM ची किंमत 40,995 रुपये,
EF-M32mm f/1.4 STM ची किंमत 34,995 रुपये,
EF400mm f/2.8L IS III USM ची किंमत 9,69,995 रुपये
EF600mm f/4L IS III USM ची किंमत 10,50,995 रुपये
माउंट अॅडप्टर EF-EOS R ची किंमत 7,995 रुपये,
कंट्रोल रिंग माउंट अॅडप्टर EF-EOS R ची किंमत 15,995 रुपये,
ND फिल्टरसह ड्रॉप-इन फिल्टर माउंट अॅडप्टर EF-EOS R ची किंमत 31,995 रुपये
PL फिल्टरसह ड्रॉप-इन फिल्टर माउंट अॅडप्टर EF-EOS R ची किंमत 23,995 रुपये ठेवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Canon launches new eos r
First published on: 24-09-2018 at 13:24 IST