फॅशन कट्टा
उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी गॉगल आणि स्कार्फसोबत महत्त्वाची असते ती टोपी! पण या टोपीमागे फॅशन दडली आहे. उन्हाळी कपडय़ांची फॅशन पूर्ण करायची असेल तर टोप्यांची फॅशन जाणून घ्यायलाच हवी.

उन्हाळ्यात स्वत:ला उन्हाच्या झळांपासून वाचवण्यासाठी सगळेचजण प्रयत्न करतात. म्हणूनच घराबाहेर पडताना गॉगल, स्कार्फ, पाण्याची बाटली असं सगळं सोबत घेतलं आहे की नाही याची खात्री करतात. तसंच उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयीही बदलतात. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, कडक उन्हापासून वाचण्यासाठी बहुतांश मुली स्कार्फचा वापर करतात तर मुलं गॉगल आणि टोपीचा वापर करतात. आता या टोपीमध्येही बरीच फॅशन दडलेली आहे. साध्याशा टोपीमुळेही लुकमध्ये खूप फरक पडतो. बाकीच्या गोष्टींप्रमाणे टोप्यांचीही फॅशन असतेच. अनेक फॅशन डिझायनर त्यांच्यासमोर कलेक्शनमध्ये कपडय़ांसोबत टोपीही देऊन समर लुक पूर्ण करतात.

how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

बेसबॉल टोपी (Baseball Cap)

हा टोपीचा प्रकार सगळ्यांनाच माहीत आहे. ही टोपी बेसबॉल या खेळाच्या खेळाडूंचा युनिफॉर्मचा अविभाज्य भाग होती. १८६० मध्ये ब्रुकलीन एक्सेल्सीअर्स (Brooklyn Excelsiors) या टीमने पहिल्यांदा ही टोपी वापरली आणि तिथूनच ही टोपी प्रसिद्ध झाली. गोलाकार सॉफ्ट भाग आणि पुढच्या बाजूला कडक भाग अशी या टोपीची रूपरेषा. पुढच्या बाजूने फिटेड आणि मागच्या बाजूने लूज आणि अ‍ॅडजस्टेबल. सुरुवातीच्या काळात ही टोपी जास्तीत जास्त स्पोर्ट्समध्ये वापरली जायची. नंतर विसाव्या शतकात सर्वसामान्य माणूसही याचा वापर करू लागला. टोपीच्या पुढच्या भागावर टीमचं पाहिलं अक्षर किंवा लोगो असायचा. आता त्यावर वेगवेगळ्या डिझाईन, वेगवेगळ्या ओळी लिहिलेल्या आपल्याला बघायला मिळतात. स्नॅपबँक (snapback) या नावानेही टोपी आता मार्केटमध्ये ओळखली जाते. या टोपीचा वापर करून उन्हाळ्यात स्ट्रीट लुक आणि स्पोर्ट्स लुक पूर्ण करता येतो.

  • लाँग फुल स्लीव्हचा गडद रंगाचा टीशर्ट आणि त्यावर कोणत्याही फिक्या रंगाची पॅण्ट. सोबतीला कोणतीही िपट्र असलेली स्नॅपबँक टोपी.
  • ओवर साइझ टीशर्टखाली स्लिम फिट जीन्स (दोन्ही फिक्यारंगाचे) आणि त्यावर प्लेन, थोडी डार्क रंगाची टोपी.
  • प्लेन रंगाच्या टीशर्टखाली डार्क रंगाची शॉट्स आणि शॉट्सच्याच रंगाची टोपी. हा लुक बीच लुक म्हणूनही प्रसिद्ध आहे.
  • सेमी फॉर्मल लुकसाठी फिक्कट रंगाचे स्लिम फिट शर्ट आणि ट्राऊझर आणि त्यावरती फिक्कट रंगाचीच साधी टोपी.
  • स्पोर्ट्स लुकसाठी तुमच्या स्पोर्ट्सच्या कपडय़ांवर कोणत्याही प्रकारची टोपी तुम्ही घालू शकता. यावर फंकी िपट्र्सच्या, नावाचं पहिलं अक्षर असलेल्या, प्लेन अशा कोणत्याही प्रकारची टोपी घालायची फॅशन आहे.

बकेट हॅट (Bucket hat)

‘दिल चाहता है’ या सिनेमाचं शीर्षकगीत आठवतंय का? या गाण्यात आमिर खानच्या डोक्यावर जी टोपी आहे तिला बकेट हॅट म्हणतात. फिशरमॅन्स हॅट, सेशन हॅट, आयरिश देश हॅट अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी ही हॅट साधारणत: १९००च्या काळात आली. आर्यलडमधली शेतकरी शेतकाम करताना डोक्यावर ही हॅट घ्यायचे. कालांतराने ती फॅशन जगतातही दिसू लागली. बादली उलटी केल्यावर जशी दिसते तशीच ही टोपी दिसते. या टोप्या जास्तीत जास्त कॉटन किंवा वूकच्या असतात. आता यामध्ये अ‍ॅडिशनल डुप्लिकेट लेदर, डेनिम कापडाच्याही टोप्या बनू लागल्या आहेत. प्लेन सिंगल रंगाच्या टोप्या नेहमीच ट्रेण्डिग असतात. याशिवाय फ्लोलर प्रिंट्र, चेक्स, टू कलर, थ्री कलरमध्येही या टोप्या बाजारात मिळतात.

  • गडद रंगाच्या प्रिण्टेड शर्टखाली डेनिम शॉर्ट्स आणि वर फिक्कट रंगाची टोपी. हा लुक उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. बीच साइड, सी-साइड हा लुक खूप छान दिसतो.
  • लाँग स्लीव्ह टी-शर्ट त्याखाली शॉर्ट्स आणि शॉर्ट्सच्याच रंगाची टोपी.
  • ओवर साइझ डेनिम शर्ट आणि ट्राऊझरवर एखादी फंकी प्रिंट्रची टोपी घालून बघा. तुम्हाला हाय स्ट्रीट फॅशन लुक मिळेल.

पोर्क पाई (Pork Pie)
पोर्क पाई टोपी साधारणत: बकेट हॅटप्रमाणेच असते. फक्त या टोपीच्या खालचा भाग कडक असतो. ही टोपी साधारणत: १८३० च्या काळात अमेरिकन आणि ब्रिटिश महिला घालत असत. पुढे १९०० व्या दशकात ही टोपी मेन्स फॅशनमध्ये रुजू झाली. ही टोपी बकेट हॅट, बेसबॉल हॅटपेक्षा जास्त फॉर्मल दिसते. आणि या टोपीमुळे पुरुष जास्त स्मार्ट दिसतात असं म्हटलं जातं. २०१५ मध्ये या टोपीची फॅशन परत आली, आणि ती अजूनही चालूच आहे. ही टोपी अनेक रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. या टोप्यांवरती शक्यतो प्रिंटस् नसतात, असल्यास जास्तीतजास्त फ्लोलर प्रिंट्र असतात. याचा वापर स्ट्रीट लुकपासून ते अगदी फॉर्मल कपडय़ांवरही आपण करू शकतो. प्रसिद्ध विनोदी अभिनेता अर्थात चार्ली चॅप्लीनच्या डोक्यावर तुम्ही नेहमीच ही टोपी बघितली असेल.

  • तुम्ही या टोपीचा वापर अगदी सूटबूट घातल्यावरही करू शकता. पार्टीमध्ये अनेकदा लोक सूट घालून जातात तेव्हा तो लुक जास्तच फॉर्मल वाटतो. अशा वेळी त्यावर लेदरची किंवा सूटनुसार फ्लोलर प्रिंट्रची टोपी नक्की घालून बघा. तुम्हाला एका टोपीमुळे पार्टी लुक नक्की मिळेल.
  • कोणत्याही प्रकारचा टी-शर्ट आणि पँटवरती त्याच रंगाची टोपी मस्त वाटते.
  • अप्पर आणि बॉटम्स दोन्ही फिकट रंगाचे किंवा त्याच रंगाचे घालून त्यावर थोडी गडद, परंतु फिकट रंगाची टोपी घालून बघा. उदा. पांढरा रंगाचा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची ट्राऊझर घाला आणि त्यावर ब्राऊन रंगाची फिकट शेडची टोपी घाला.
  • आतून कोणत्याही प्लेन रंगाच्या टी-शर्टवर फ्लोरल िपट्रचा शर्ट (जॅकेटसारखा) घालावा. आणि त्याखाली कोणत्याही गडद रंगाची शॉर्ट्स घाला. या लुकवर फ्लोरल िपट्रची टोपी किंवा दोन रंग असलेली टोपी घाला.

न्यूजबॉय टोपी
ही टोपी अनेक वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे. न्यूझीकॅप (Newsy cap), अ‍ॅप्पल कॅप (Apple Cap), अ‍ॅप्पलजॅक हॅट (Applejack Hat), कब्बी कॅप, बॅन्डिट कॅप (Bandit Cap) अशा अनेक नावांनी या टोपीची ओळख आहे. ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांनी त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये, गाण्यांमध्ये या प्रकारची टोपी घातलेली तुम्हाला आठवत असेल. भारतात ही टोपी कधीही आऊट ऑफ फॅशन झाली नाही. थोडय़ा प्रमाणात का असेना याचा वापर अनेकजण करताना दिसतात. कधीतरी अचानक ही टोपी कोणत्यातरी सिनेमातून दिसते तर कधीतरी एखाद्या फॅशन डिझायनरच्या कलेक्शनमधून.

  • ही टोपी तुम्ही अगदी कोणत्याही प्रकारच्या लुकवर घालू शकता.
  • मोठय़ा चेक्सचा फॉर्मल शर्ट आणि ट्राऊझरवर छोटय़ा चेक्सची ही टोपी घालून बघा.
  • टीशर्टवर जॅकेट आणि खाली शॉर्ट्स आणि कोणत्याही गडद रंगाची टोपी. झाला की समर  लुक तयार!
  • फॉर्मल सूट-बूटवरही प्लेन रंगाची टोपी तुम्हला हटके लुक मिळवून द्यायला मदत करते.

सेलिब्रिटी लुक :-
एमटीव्हीच्या रोडीज या शोमुळे तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला हिरो म्हणजे रणविजय सिंघ. काही सिनेमे, मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोजमुळे तो प्रसिद्ध आहे. त्याच्या कामासोबतच त्याच्या लुकची, फॅशनचीही नेहमीच चर्चा असते. रणविजय अगदी नेहमीच त्याच्या लुकमध्ये टोपीचा वापर करतो. त्याच्यासारखा लुक तुम्हीही आरामात मिळवू शकता. त्यासाठी काही टिप्स:

  • लोअर गारमेंटमध्ये कोणत्याही गडद रंगाची जीन्स घाला.
  • त्यावर थोडा ओव्हर साइझ लाइट रंगाचा टी-शर्ट.
  • त्यावर टी-शर्टसारखा परंतु दोन शेड डार्क रंगाचं प्रिंट्रेड जॅकेट.
  • त्यावर टू कलर गडद रंगाची बेसबॉल टोपी/ स्नॅपबँक टोपी घाला.
  • या टोपीवर तुमच्या नावाचं पहिलं अक्षर असेल तर उत्तमच.

तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा