News Flash

वाहनांची देखभाल करा, आयुर्मान वाढवा

पर्यावरणाच्या दृष्टीने वाहनांना धूर बाहेर फेकण्यावर खूप नियंत्रण आलेले आहे.

अजय महाडिक

वाहनाची काळजी घेताना आणि ते कायम सुदृढ राहील यासाठी वाहनाची दैनंदिन, साप्ताहिक, मासिक, त्रमासिक, षण्मासिक, वार्षिक  देखभालीविषयी काळजी घेण्याचा सल्ला वाहन तंत्रज्ञांनी दिला आहे.

अलीकडे नवनवीन तंत्रांच्या आधारावर वाहने बाजारात येत आहेत. त्यामुळे दर काही दिवसांनी नवीन वाहन बाजारात येत असते. त्यामुळे ते खरेदी करण्याचा मोह प्रत्येकालाच असतो. अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात दर सहा वर्षांनी वाहनबदल होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासाठी आपण वापरलेल्या वाहनाचे बाजारमूल्यही चांगले यावे यासाठी वाहनाची देखभाल ही खूप महत्त्वाची असते. अन्यथा आपल्याला आर्थिक फटकाही बसू शकतो.

वाहन चालकाशी बोलत असते. हे ऐकल्यावर कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. पण एका निष्णात चालकाचे हे प्रमुख लक्षण मानले जाते. बऱ्याचदा वाहनात बिघाड झाल्यावर किंवा रस्त्यात अचानक बंद पडल्यावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सोबत कुटुंब असेल तर मोठी पेचप्रसंग निर्माण होता. मात्र हे टाळणे आपल्याच हाती असते, पण आपण त्याचा गांभीर्याने विचार करीत नाही. यासाठी वाहन चालविताना पुढील परिस्थिीतीचे जाणीव वाहनच आपल्याला करून देत असते, मात्र आपण ते बारकाईने पाहणे गरजेचे असते. यासाठी वाहनचालकाला काही तांत्रिक बाबी माहिती असल्या तर निर्माण होणारी परिस्थिती आपण टाळू शकतो. तसेच वाहनाची वाहनाची वेळच्यावेळी देखभाल केली तर आपण हे टाळू शकतो. यासाटी वाहनाच्या कार्यपद्धतीविषयी चांगली माहिती असणे आवश्यक आहे.

नवनवीन प्रकारची वाहने बाजारात आली, त्यांच्या तंत्रज्ञानात कितीही क्रांतिकारक सुधारणा झाल्या असल्या तरी वाहनमालकाच्या दृष्टीने देखभालीच्या पद्धतीत मात्र फारसा फरक पडत नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने वाहनांना धूर बाहेर फेकण्यावर खूप नियंत्रण आलेले आहे. पी.यू.सी. तंत्रज्ञानामुळे बहुतेक सर्व मोटर्स कारमध्ये इंजिन तंत्रज्ञान इतके सुधारले आहे की, पारंपरिक काब्र्युरेटरएवजी आता कॅटॅलिटिक कन्व्हर्टर्स बसवलेले असतात. कित्येकांनी एम.पी.एफ.एम. सिस्टीम बसवलेली असते. काही निर्मात्यांनी त्याही पुढे जाऊन त्यांच्या मोटरकार्समध्ये संगणकीय प्रणाली व मायक्रो प्रोसेसर्स बसवलेले असतात.

या सर्व बाबींची माहिती वाहनखरेदीवेळी आपल्याला दिलेल्या पुस्तिकेत वाहनाची कार्यपद्धती, देखभाल, साधने, उपकरणे यांविषयी परिपूर्ण माहिती असते.   देखभाली संदर्भात वाहनमालकाने केवळ निर्मात्या कंपनीच्या विक्रीपश्चात सेवेवर पूर्णपणे न विसंबून राहता ती स्वत: घ्यावी असा सल्ला ऑटोमोबाइल अभियंते अनुज अडकमोल यांनी दिला आहे.

गंजरोधक प्रक्रिया

मुंबईसारख्या सागरकिनाऱ्यावरील शहरात दमट हवामान असल्या कारणाने वाहनांच्या धातूच्या भागांवर गंज झपाटय़ाने चढतो. इतरत्रही वातावरणातील काही रसायनांमुळे धातूच्या भागांवर गंज चढतो. त्यामुळे वेळोवेळी व विशेषत: पावसाळ्यापूर्वी वाहनास गंजरोधक प्रक्रिया करून घेणे आवश्यक असते.

१) दैनंदिन कामे : यात वाहन स्वच्छ पुसणे, समोरची काच स्वच्छ व डागविरहित पारदर्शक असल्याची खात्री करून घेणे, वाहन आतील बाजूनेही स्वच्छ करून घेणे, वाहन चालवले जाणार नसल्यास ते सुरू करून थोडे रेझ करून बॅटरी चार्ज करून ठेवणे, वाहनाचे माइलेज लॉगबुकात नोंद करणे.

२) साप्ताहिक कामे : इंजिनाचे तेल, कुलंट, पाणी, वायपर्ससाठी असलेल्या टाकीत पाणी भरणे, सर्व चाकांची हवा चेक करणे, ब्रेक फ्ल्युइड तपासून घेणे.

३) मासिक कामे : वाहनाची सव्‍‌र्हिसिंग करून घेणे, वाहनातील फिरणाऱ्या भागांच्या सांध्यांना वंगण (ग्रीस) लावणे आदी.

४) त्रमासिक कामे : वाहनाची बॅटरी तपासून घ्यावी, पॉवर स्टेअिरग तपासणी (व्हिल बॅलेंसिग) करून घ्यावी, ट्रान्स्मिशन फ्ल्युइड तपासून घ्यावे, फॅनबेल्ट तपासणी व त्यावरील ताण यथायोग्य असल्याची खात्री करावी.

५) मासिक कामे : वाहनाचे इंजिन टय़ुनिंग करून घ्यावे, काब्र्युरेटर सेंटिंग करून घ्यावे, ऑइल फिल्टर बदलून घ्यावे, वाहनाच्या चाकाची परस्परात स्टेपनीसह अदलाबदल करावी, टायर्स तपासून घ्यावे, पी.यू.सीचा दाखला नूतनीकृत करून घ्यावा.

६) वार्षिक कामे : वाहनाच्या चाकातील बेअिरग्ज व सस्पेंशन तपासून घ्यावे, ब्रेकिंगसिस्टीम तपासून घ्यावी, ब्रेक फ्ल्युइड बदलावे, एअर फिल्टर, ऑइल फिल्टर, फ्ल्युएल फिल्टर स्वत:समोर काढायला लावून ते बदलून घ्यावे, दरवाजाच्या बिजागऱ्यांना व हँडल्सना ग्रीसिंग करून घेणे, रबराचे भाग तपासून घ्यावे, व्हील असेंब्ली तपासावी, वाहनास गंजविरोधी प्रक्रिया करून घ्यावी.

बॅटरीचा वापर

वाहनातील ’अल्टरनेटर’ नावाच्या उपकरणाच्या साहाय्याने वाहनांची बॅटरी नेहमी भारित (चार्ज) होत राहते. बॅटरी चार्ज आहे किंवा कसे हे वाहनातील डॅशबोर्डावर पुरवलेल्या लाल बल्बवरून समजत बॅटरी निकामी होण्याची अनेक कारणे असू शकतात. प्रत्यक्ष बॅटरीच जुनी, बॅटरीच्या टर्मिनल्सवर कॉपर सेल्फेक्टची पुटेच्या पुटे साठलेली असणे, वाहनातील वायिरग सदोष असणे किंवा अल्टरनेटर योग्य प्रकारे काम करत नसणे इत्यादी बॅटरी निकामी होण्याची कारणे असू शकतात.

वाहनाची चाके

वाहनाची थरथर, आवाज, सुलभ हाताळणी आणि सफरीचा आनंद ह्य बाबी चाकांच्या स्थितीवर अवलंबून असतात. खरे तर चाके वाहनाचे एकंदरीत दर्शनही सुखावह करण्यास मदत करतात. वाहनाचे आयुष्य, कार्यक्षमता, सुरक्षितता इत्यादी बाबी चाकांच्याच स्थितीवर अवलंबून असतात. तरीही चाके हा वाहनमालकांकडून दुर्लक्षित असा भाग असतो. मधूनमधून हवा भरली किंवा तपासली की देखभाल संपली असा गैरसमज असतो. हवा कमी असल्यास चाकांची झीज होते. वाहन हाताळणे जड जाते व इंधनही अधिक खर्च होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 2:11 am

Web Title: car maintenance tips to keep vehicle in good condition zws 70
Next Stories
1 केसांमध्ये सतत कोंडा होतो? मग लिंबाच्या वापरामुळे करा ही समस्या दूर
2 Saregama ने लाँच केला शानदार स्क्रीन असलेला नवीन म्युझिक प्लेअर, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
3 PUBG Mobile India Update: PUBG ची आतुरतेने वाट बघणाऱ्यांसाठी ‘बॅड न्यूज’ !
Just Now!
X