मसाल्याच्या पदार्थांमधील सर्वात सुगंधित पदार्थ म्हणजे वेलची. पदार्थाची चव वाढविण्यासोबतच आरोग्यासाठीही वेलची तितकीच उपयोगी आहे. गोड पदार्थांमध्ये आवर्जुन वापरण्यात येणाऱ्या वेलचीमध्ये खनिजे आणि व्हिटॅमिन्सची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे अन्नपचनाची प्रक्रिया सुरळीत होते. तसंच वेलची खाण्याचे अन्यही काही फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात वेलची खाण्याचे फायदे. –

१. जर तुम्हाला वारंवार अ‍ॅसिडीटी (अपचन) होत असेल तर आहारात वेलचीचा आवर्जुन समावेश करावा. जेवण झाल्यावर थोडीशी वेलची चघळावी. वेलचीच्या सेवणामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

२. वेलची खालल्यामुळे भूक चांगली लागते.

३. वेलची चावून खाल्ली तर अ‍ॅसिडीटी दूर होते शिवाय जळजळही थांबते.

४. खोकला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास वेलची मदत करते.

५. दररोज एक वेलची खालल्यामुळे श्वसनासंबंधीचे आजार दूर होण्यास मदत होते.

६. शरीरातील रक्तदाबाची पातळी स्थिर राखते

७. वेलची दातांच्या समस्येवर उपयुक्त असते. अनेक माऊथ फ्रेशनर्स आणि टुथपेस्टमध्येही वेलचीचा समावेश असतो. जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गांशी सामना करण्यासाठी वेलची एक उत्तम औषध म्हणून काम करते. तोंडाला होणारे अल्सर आणि घशाच्या संसर्गांवर वेलचीचे पाणी पिणे उपयुक्त ठरते.