18 January 2019

News Flash

सेल्फ सव्‍‌र्हिस : सायकल जपताना..

विशेषत: सायकली साफसफाई करताना किंवा सायकल चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

सायकल चालवणे तरुणाईला आवडते. व्यायाम म्हणून किंवा प्रवासासाठी सायकलचा वापर केला जातो. साहसी राइड, पावसाळी सहलींसाठीही सायकल प्रमाण वाढले आहे. मात्र सायकलचे आयुर्मान वाढण्यासाठी सायकलची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. विशेषत: सायकली साफसफाई करताना किंवा सायकल चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

  • सायकलचा वापर नसेल त्या वेळी ती योग्य ठिकाणीच पार्क करा. शक्यतो घराच्या आवारात ती पार्क करावी. त्यामुळे पाऊस, आद्र्रता, धूळ यांच्यापासून तिचे संरक्षण होईल.
  • पाऊस आणि आद्र्रतेमुळे सायकलला गंज चढतो. धुळीमुळे सायकलचे भाग लवकर खराब होतात. त्यामुळे ती नेहमी दुरुस्त करावी लागते. तुम्ही सायकलचा सातत्याने वापर करीत असाल, तर आठवडय़ातून एकदा तरी तिची साफसफाई करणे आवश्यक आहे. सायकल पाण्याने धुवू शकता. मात्र ते करण्यापूर्वी सीट आणि हॅण्डलला प्लास्टिकचे कव्हर लावा.
  • पाइपद्वारे पाण्याच्या फवाऱ्याने सायकलची चाके धुवा. त्यामध्ये असणारी धूळ, कचरा साफ होईल.
  • सायकलच्या साखळीमध्ये (चेन) वेळच्या वेळी वंगण टाका. लक्षात घ्या, वंगण हे दर्जेदार असले पाहिजे.
  • नियमित सायकल चालवणाऱ्याने घरी हवेचा पंप, पंक्चर किट ठेवावे. चाकात कमी हवा असेल तर सायकल चालवू नका. ते धोकादायक आहे. सायकल घेऊन दूरवर जाणार असाल तर पंक्चर किट सोबत घ्या.
  • अनेक जण दरवाजाच्या बिजागरींना लावण्यात येणारे वंगण किंवा तेल सायकलच्या साखळीमध्ये टाकतात. यामुळे सायकल लवकर खराब होऊ शकते, हे लक्षात घ्या. सायकल चालवण्यापूर्वी तिची यंत्रणा व्यवस्थित आहे की नाही हे तपासून घ्या. सायकलच्या चाकातील हवेचा दाब तपासून घ्या.
  • सायकल झेपेल इतकेच वजन सायकलवर टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिक वजनाचे सामान सायकलवरून वाहू नका. महिन्यातून एकदा सायकल दुरुस्त करणाऱ्या दुकानात जाऊन तिची यंत्रणा तपासून घ्या. पंक्चर, साखळी, सायकलचे सिंट, पॅण्डल, हॅण्डल जर नादुरुस्त असेल, तर ते दुरुस्त करून घ्या.

First Published on May 17, 2018 12:25 am

Web Title: care for your cycling