भीम (BHIM)अॅपकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे. भीम अॅपला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही ऑफर देण्यात आली आहे. गेल्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे अॅप लॉन्च करण्यात आलं होतं. ही कॅशबॅक ऑफर, ग्राहक आणि व्यापारी दोघांसाठी आहे. ऑफरअंतर्गत एकूण १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
भीम अॅपच्या कॅशबॅक ऑफरअंतर्गत ग्राहकांना एका महिन्यात ७५० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल, तर व्यापा-यांना १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. नव्या युजर्सला पहिल्या ट्रांजेक्शनवर ५१ रुपये कॅशबॅक मिळेल. पण, पहिलं ट्रांजेक्शन किमान किती रुपयांचं असावं याबाबत माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे ग्राहक १ रुपयांचं ट्रांजेक्शनही करुन ५१ रुपये कॅशबॅक मिळवू शकतात असं बोललं जात आहे.
भारत शासनाचे भीम अॅप्लिकेशन हे यूपीआय-आधारित असे एक अॅप आहे. केवळ दोन एमबीचं हे अॅप ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’द्वारे हे अॅप चालवलं जातं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 15, 2018 5:38 pm