व्हॉट्स अॅप या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग अॅप्सवर गेल्या वर्षभरात नवनवीन फीचर्स आले. या फीचर्समुळे व्हॉट्स अॅप वापरणं अधिक सुलभ आणि सोप्पं झालं. आता नविन वर्षांत व्हॉट्स अॅप वापरणं अधिक सुलभ व्हावं यासाठी व्हॉट्स अॅप आणखी काही फीचर्स आणणार आहे. या फीचर्सची चाचणी सुरू आहे. ही फीचर्स कोणती असतील ते पाहू.

Voice to Video Call Switch : वर्षभरापूर्वी व्हॉट्स अॅपनं व्हिडिओ कॉल हे फीचर आणलं होतं. पण, या फीचरमुळे फक्त एकाच व्यक्तींशी बोलता येत होतं. पण, आता एकापेक्षा अधिक व्यक्तींशी व्हिडिओ कॉलद्वारे जोडता येणार आहे. व्हॉट्स अॅप या फीचरची चाचणी करत आहे.
Group calls : कॉन्फरन्स कॉलप्रमाणे लवकरच व्हॉट्स अॅपवरदेखील ग्रुप कॉल करता येणार आहेत. व्हॉट्स अॅपवर अनेकांचे ग्रुप्स असतात. त्यामुळे ग्रुप्समध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

instagram Stories on WhatsApp : इन्स्टाग्राम स्टोरीदेखील लवकरच व्हॉट्स अॅपवर शेअर करता येणार आहे. यापूर्वी इन्स्टाग्रामची स्टोरी फेसबुकवर शेअर करता येत होती. पण आता या स्टोरी स्टेटस म्हणून व्हॉट्स अॅपवर ठेवता येणार आहेत. या तिन्ही फीचर्सची सध्या चाचणी सुरू आहे, पण लवकरच ही फीचर्स व्हॉट्स अॅपवर उपलब्ध होणार आहेत.