भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी विविध श्रेणीतील अनेक प्लॅन्स आहेत. जिओने अलिकडेच आपल्या अधिकृत वेबसाइटवर कंपनीचे ‘बेस्ट सेलिंग प्लॅन्स’ अपडेट केले आहेत. जाणून घेऊया कोणते आहेत जिओचे सर्वाधिक मागणी असलेले प्लॅन्स :-

जिओच्या वेबसाइटनुसार, 199 रुपये, 555 रुपये, 599 रुपये आणि 2,399 रुपये या चार प्रीपेड प्लॅन्सची मागणी सर्वाधिक आहे. 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. म्हणजे यामध्ये युजर्सना एकूण 42 जीबी डेटा मिळतो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. याशिवाय जिओ अ‍ॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळतं.

कंपनीचा दुसरा प्लॅन 555 रुपयांचा आहे. यात 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. म्हणजे युजर्सना एकूण 126 जीबी डेटा मिळेल. अशाचप्रकारे 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते, पण यात दररोज 2 जीबी डेटा मिळतो म्हणजेच एकूण 168 जीबी डेटा वापरायला मिळतो. याशिवाय, दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि फ्री जिओ अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शनही मिळेल.

जिओचा सर्वाधिक डिमांड असलेला अखेरचा आणि सर्वात महागडा प्लॅन 2399 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता एक वर्षाची आहे. 365 दिवसांपर्यंत दररोज 2 जीबी डेटा मिळेल, म्हणजे युजर्सना एकूण 730 GB डेटा वापरण्यास मिळेल. प्लॅनमध्येही सर्व नेटवर्कवर कॉलिंग फ्री आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. याशिवाय JioTV, JioCinema आणि JioNews या अ‍ॅप्ससाठी मोफत अ‍ॅक्सेसही मिळतो.