News Flash

तुमची नखं तपासून पाहा… हे बदल दिसत असतील तर तुम्हाला करोना संसर्ग होऊन गेलाय असं समजा

करोनामधून मुक्त झालेल्यांच्या नखांमध्ये एक विचित्र बदल दिसून येत आहे, अर्थात हा बदल कायम स्वरुपी नसला तरी त्यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचं ठरतं

कोविडपासून बरे झालेल्या रूग्णाच्या नखांचे रंग बदले.

गेल्या दीड वर्षात करोनाची अनेक लक्षणे आढळली आहेत. दर काही दिवसांनी करोनाची एक नवीन लक्षण समोर येत असल्याचं चित्र अनेकदा दिसून आलं. विषाणू जसा स्वरुप बदलतोय त्याप्रमाणे या संसर्गाची लक्षणंही वारंवार बदलत आहेत. दरम्यान लक्षणं दिसल्यास घाबरून जाण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास वेळीच उपचाराने करोनावर मात ककता येते. यापूर्वी केवळ फुफ्फुसं, घसा, नाक, जीभ या अवयवांवर दिसणारा परिणाम आता नखांवरही दिसू लागलाय, बर्‍याचदा आपण आपल्या नख्यांकडे लक्ष देत नाही. पण आता त्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे कारण करोना संसर्ग होऊन गेलाय की नाही याचा अंदाज आता नखांवरुनही लावला जातोय कारण संसर्ग झाल्यावर नखांवरही परिणाम झाल्यांच दिसून येत आहे. जाणून घेऊयात यासंदर्भात अधिक माहिती…

नखांमध्ये काय बदल होतो?

करोना संसर्गातून बरं झाल्यानंतर रुग्णाच्या नखांमध्ये विचित्र बदल पाहिले जात आहेत. नखांवर लाल चंद्रकोरचा आकार तयार होते आणि तो बराच काळ ती तशीच राहते. डॉक्टरांच्या मते, अशी लक्षणे आताच दिसू लागली आहेत. मागील एक वर्षापूर्वी  अशी लक्षणे यापूर्वी कधीही पाहिली गेली नाहीये . त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

नखांवर का दिसताय ही लक्षणं

जेव्हा करोना विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवरही होतो. तसेच, बर्‍याच वेळा जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती शरीरात संक्रमणास विरोध करते तेव्हा रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. यामुळे, नखांवर काही लाल डाग दिसतात आणि काही नखांवर त्याचा परिणाम दिसून येतो. ही लक्षणं नखांवर चार आठवड्यांपर्यंत राहू शकतात. सामान्यपणे करोनामधून मुक्त झालेल्यांमध्ये हे बदल दिसत असले तरी काही डॉक्टरांच्या सांगण्यानुसार हे बदल करोना संसर्ग होऊन गेल्याचं दर्शवतात.

नखे कमकुवत होत आहेत

करोना संसर्गामध्ये नखांची लक्षणं दिसून आलेल्या लोकांमध्ये असेही आढळले की नखं खूपच नाजूक होतात.  करोनामधून बरे झाल्यानंतरही या आजारामुळे नखे कमकुवत झाल्याने ती तुटण्याची शक्यताही असते. त्यामुळे जर नखांची लक्षणे दिसली असतील तर योग्य वेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तणावामुळे नखांच्या रंगात बदल

चार आठवड्यांनंतर नखांवर निर्माण झालेलं हे लाल अर्धवर्तुळ दिसत नाही. मात्र नंतर नखांचा रंग बदलण्याची शक्यता आहे. नखांच्या रंगात बदल होण्यामागील मुख्य कारण म्हणजे रक्तपेशींवर आलेला ताण. संक्रमण दरम्यान किंवा त्यानंतरही काही फार प्रमाणात हा ताण कायम राहतो. करोनामधून रिकव्हरीनंतर नखांचा रंग हळूहळू पूर्वव्रत होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 4:29 pm

Web Title: check your hands for covid nails in the second wave of corona virus
Next Stories
1 रात्रीच्या जेवणात भात योग्य की पोळी?; जाणून घ्या कसा असावा रात्रीचा आहार
2 ‘सुपर बाइक’चे नवे पर्याय
3 पावसाळ्यामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्या; जाणून घ्या ८ खास टीप्स
Just Now!
X