‘इंडियन मोटारसायकल’ने भारतात Chieftain Elite ही लक्झरी बाईक लॉन्च केली आहे. जगभरात या बाईकच्या केवळ 350 युनिट्सची विक्री होणार आहे. एखाद्या लक्झरी कारमध्ये मिळणाऱ्या सर्व सुखसोयी या बाईकमध्ये देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. या बाईकची किंमत तब्बल 38 लाख रुपये इतकी आहे. बाईकच्या रंगकामावर विशेष मेहनत घेण्यात आली असून एका बाईकला रंगवण्यासाठी 25 तास लागतात, असं कंपनीने सांगितलं.

Chieftain Elite मध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. या बाईकला मशीनने रंग न देता रंगारींकडून रंग देण्यात आला आहे, या कामासाठी एका बाईकला तब्बल 25 तास लागतात. बाईकमध्ये कस्टम लेदर सीट, ब्ल्यू-टुथ कनेक्टिविटी, टर्न-बाय-टर्न नेव्हीगेशन सिस्टिम, 200 wattची प्रीमियम ऑडिओ सिस्टिम देण्यात आली आहे. तर, 388 किलो इतकं या बाईकचं वजन आहे. याशिवाय बाईकमध्ये पुश-बटन पावर विंडशिल्ड, राईड कमांड इन्फोटेन्मेंट सिस्टिमही देण्यात आली आहे. रिमोट-लॉकिंग हार्ड वॉटरप्रूफ सॅडलबॅग, अॅल्युमिनियम फ्लोअरबोर्ड, पिनॅकल मिरर आणि क्रॉसओव्हर पाइपसह ड्युअल एग्जॉस्ट सिस्टीम देण्यात आलं आहे.

नव्या Indian Chieftain Elite बाइकमध्ये 1811cc, थंडरस्ट्रोक 111 V-ट्विन इंजिन देण्यात आलं असून याद्वारे 3000rpm प्रती 161.6Nmचं टॉर्क जनरेट करतं. बाइकच्या पुढील चाकाला दोन डिस्क आणि मागील चाकाला एक डिस्क ब्रेक दिला आहे, पुढील टायर 19 इंचाचा तर मागील टायर 16 इंचाचा आहे.