28 September 2020

News Flash

VIDEO: ऑनलाइन विश्वात हरवलेल्यांची…’गोष्ट बालमनाची’

मुलं आणि ऑनलाइन विश्वाबद्दलची अनेक प्रश्नांची उत्तरे आणि माहिती

बालवयात अनेक गोष्टींची कुतुहूलता आणि उत्सुकताही असते. मात्र यातूनच अनेकदा चुकीच्या गोष्टींमध्ये मुलं गुंतण्याची शक्यता असते. सध्याच्या घडीला लहान मुलांबाबत एक समस्या प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे ऑनलाइन विश्व… मुलं या ऑनलाइन दुनियेच्या जाळ्यात अडकली असून याचा परिणाम त्यांच्या बालमनावरही होताना दिसत असतो. मुलं नक्की काय बघतात? ते ऑनलाइन का असतात? त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो? या अशा मुलं आणि ऑनलाइन विश्वाबद्दलची अनेक प्रश्नांची उत्तरे आणि माहिती आपण लोकसत्ताच्या ‘गोष्ट बालमनाची’ या विशेष सीरिजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. समाजमाध्यमांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

गेमिंग, पॉर्न, आई वडिलांच्या मोबाइलमधल्या गॅलरीत राहून गेलेल्या क्लिप्स अशा अनेक माध्यमातून लहान मुलं ऑनलाइन विश्वातल्या अनेक गोष्टींकडे आकर्षित होतात. हा प्रवास कसा होतो? तो टाळता येणं शक्य आहे का? त्यावर काही मार्ग आहे का? अशा अनेक बालमनाशी निगडीत गोष्टींचा उहापोह आपण या सीरिजच्या माध्यमातून करणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 8:02 am

Web Title: children and online world gosht balmanachi series sgy 87
Next Stories
1 चिमुकल्यासाठी अमृत; स्तनपान केल्याने बाळाला होणारे फायदे
2 Yamaha ची ‘पॉप्युलर’ स्पोर्ट्स बाइक झाली महाग, कंपनीने वाढवली किंमत
3 Tiktok ची नाही भासणार गरज, Instagram ने लाँच केलं शानदार फीचर
Just Now!
X