हिरवीगार जंगले नष्ट होऊन आता क्राँकिटची जंगलं वाढत चालली आहेत. माणसाने आपल्या वस्त्या वसवण्यासाठी ही जंगल तोडून साफ केलीत. त्यामुळे दिवसेंदिवस जगातील अनेक प्रगतीशील देश प्रदूषणाच्या विख्याळ्यात सापडत चालला आहे. चीनमध्ये तर ही समस्या अधिकाअधिक मोठी होत चालली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीन पहिल्या क्रमांवर होताच पण जगातील सगळ्यात प्रदूषित शहरांच्या यादीतही चीन आहे. चीनला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. त्यातून बिंजीग हे शहर तर सगळ्यात प्रदूषित शहर बनलं आहे. लोकांना मोकळा श्वासही घेता येत नाही. झाडं तर या परिसरात नाहीच. आता झाडं लावायचीच झालीच तर ती लावणार कुठे? अशा एक ना दोन शेकडो समस्या या लोकांपुढे आहे. म्हणूनच चीन आता क्राँकिंटच्या जंगलातच जंगल उभारण्याच्या बेतात आहेत.

प्रदूषण कमी व्हावे, लोकांना स्वच्छ ऑक्सिजन मिळावा यासाठी आता चीन नव्या प्रकल्पावर काम करत आहे. चीनमधल्या नानजिंगमध्ये वर्टिकल फॉरेस्ट्स उभारण्याचा एक प्रयोग सुरू आहे. २०१८ पर्यंत हा प्रयोग पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा आहे. प्रसिद्ध आर्किटेक्ट Stefano Boeri यांच्या कल्पनेतून वर्टिकल फॉरेस्ट्स हा प्रकल्प उभा राहिला आहे. चीनमध्ये मोठ मोठ्या अनेक इमारती आहेत. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास २५ स्थानिक प्रजांतीची झाडे लावण्यात येणार आहे. यामुळे ६० किलोग्रॅमपर्यंत ऑक्सिजन तयार होऊ शकतो. याआधी इटलीमध्ये असा प्रयोग करण्यात आला होता.