News Flash

शीत कटिबंधात राहणाऱ्यांना कर्करोगाचा धोका अधिक

स्थानिक सरासरी तापमान आणि कर्करोगाचा धोका यांच्यातील संबंध संशोधकांनी शोधण्याचा प्रयत्न केला.

| December 11, 2017 02:29 am

cancer-cells
संग्रहीत छायाचित्र

शीत कटिबंधात राहणाऱ्या नागरिकांना कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.डेन्मार्क आणि नॉर्वेसारख्या शीत प्रदेशात राहणाऱ्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जगात सर्वाधिक असल्याचे संशोधकांनी या संशोधनात स्पष्ट केले आहे.

हे संशोधन ‘द जर्नल मोलेक्युलर बायोलॉजी अँड इव्हॉल्यूशन’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे. शीत कटिबंधीय प्रदेश आणि अतिउंचावरील ठिकाण यांमुळे मानवामध्ये कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अतिशय तीव्र वातावरणाचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत असतो.

त्यामुळे कर्करोगासारखे आजार उद्भवतात, असे सायप्रस विद्यापीठातील कॉन्स्टनटिनोस व्होस्कारिडेस यांनी सांगितले. कमी तापमान आणि उंच ठिकाणी राहणे यांमुळे प्रकृतीची हानी होते. पर्यावरणातील किंवा हवेतील शरीराला आवश्यक घटक येथील रहिवाशांना मिळत नाहीत. त्याचा विपरीत परिणाम होऊन कर्करोगाचा धोका वढतो, असेही व्होस्कारिडेस म्हणाले. कमी तापमानात राहिलेल्या व्यक्तींच्या शरीरावर होणारे परिणाम या विषयावर संशोधकांनी संशोधन केले. स्थानिक सरासरी तापमान आणि कर्करोगाचा धोका यांच्यातील संबंध संशोधकांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार जगभरातील आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 2:28 am

Web Title: citizens living in cold regions has more risk of cancer
Next Stories
1 टोयोटाच्या या ऑफर्स माहितीयेत? 
2 ‘ही’ आहेत रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे
3 घसा खवखवतोय? ‘हे’ उपाय करुन बघा
Just Now!
X