मसाल्याच्या पदार्थामधील एक अविभाज्य घटक म्हणजे लवंग. कोणताही गोडा मसाला, मालवणी मसाला किंवा अन्य कोणत्याही गरम मसाल्यामध्ये लवंगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासोबतच मसालेभात किंवा एखादा गोड पदार्थ (नारळी भात) केल्यावर त्यातही बऱ्याचदा लवंग घातली जाते. विशेष म्हणजे लवंग चवीने कितीही तीक्ष्ण आणि उग्र असली तरीदेखील तिचं महत्त्व फार आहे. त्यामुळे जाणून घेऊयात लवंग खाण्याचे काही गुणकारी फायदे.

१. लवंगामध्ये युजेनॉल असतं त्यामुळे सायनस किंवा सर्दी सारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

२. लवंग उष्ण गुणधर्माची आहे. त्यामुळे सर्दी किंवा खोकला झाल्यास लवंग चघळावी किंवा चहा करताना त्यात १-२ लवंगा टाकाव्यात.

३.कफ विकारात गुणकारी.

४. पोटदुखी दूर होते.

५. सतत तहान लागत असल्यास लवंग खावी.

६. दमा, उचकी,रक्तविकार यात समस्येमध्ये लवंग खाल्यास आराम मिळतो.

७. लवंगाच्या तेलामुळे घसा, गळा, गाल, जीभ सर्व स्वच्छ राहते.

८. सर्दीमुळे नाक वारंवार बंद होत असेल तर लवंगाच्या तेलाचे दोन-चार थेंब रुमालावर टाकून ते हुंगावे त्यामुळे नाक मोकळं होतं.

९. जुनाट सर्दी असल्यास डोक्यावर लवंग,सुंठ आणि वेखंड यांचा लेप करुन लावावा.

१०. तोंडातून दुर्गंधी येत असल्यास लवंगाचं तेल आणि पाणी एकत्र करुन त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

११. दात दुखत असल्यास लवंगाचं तेल, कापूस व किंचित तूप एकत्र करुन कापसाचा बोळा दुखऱ्या दातावर ठेवावा. मात्र, लवंग तेलाचे प्रमाण कमी असावे.

१२. अनेकदा वृद्ध व्यक्तींना बोलताना ठसका किंवा धाप लागते अशा वेळी १ लवंग चघळावी.

१३.लवंग बुद्धी तल्लख ठेवते.

१४. जेवण जास्त झाल्यास लवंग चघळावी. पचनक्रिया सुरळीत होते.