कॉफीवर झालेल्या एका नव्या संशोधनानुसार दिसून आले आहे की, दिवसभरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक कप चहा पिणाऱ्या महिला डिप्रेशनला बळी पडत नाहीत. मात्र, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण संशोधकांच्या मतानुसार कॉफीत असणाऱ्या कॅफीनचा हा परिणाम असण्याची शक्यता आहे. कारण कॅफीन नसलेल्या कॉफी पिणाऱ्या महिलांवर हा परिणाम दिसून आलेला नाही.
या संशोधनासाठी ५१ हजार अमेरिकन परिचारिकांचा कॉफी पिण्याच्या प्रमाणाचा अभ्यास करण्यात आला. कॉफी, कॅफेन आणि नैराश्य (डिप्रेशन) यांचा काय संबंध आहे, हे अधिक सखोलपणे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांकडून अधिक जोर दिला जात आहे. पण, मुड चांगला ठेवण्यासाठी महिलांना कॉफी पिण्यास सांगणे हे घाई करणे होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. हावर्ड मेडिकल स्कूलच्या एका दलानं १९९६ आणि २००६ या दशकांच्या दरम्यान महिलांच्या आरोग्यावर नजर ठेवली. त्यांच्या कॉफी पिण्याच्या प्रमाणाची माहिती जमा करण्यासाठी प्रश्नांची यादी बनवली.
या काळात फक्त २ हजार ६०० महिला डिप्रेशनला बळी पडल्या आहेत, त्यात जास्त महिला या कॉफी न पिणाऱ्या आहेत तर काही फारच कमी प्रमाणात कॉफी पिणाऱ्या आहेत. ठवड्यात एक कप किंवा त्यापेक्षा कमी कॉफी पिणाऱ्या महिलांची तुलना ही दिवसातून दोन-तीन कप कॉफी पिणाऱया महिलांशी केली गेली. कॉफी जास्त प्रमाणात पिणाऱ्या महिलांमध्ये डिप्रेशनचा धोका १५ टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले आहे. मात्र दिवसातून चार किंवा अधिक कप कॉफी पिणाऱ्या महिलांमध्ये हा धोका २० ट्क्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले.