14 July 2020

News Flash

कॉफीमुळे मधुमेहापासून बचाव होण्यास मदत

कॉफीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.

| September 8, 2017 01:45 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कॉफीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. संशोधकांनी या पेयामधील मुख्य घटक शोधला असून, या घटकामुळे टाइप २ चा मधुमेह होण्याचा धोका कमी होत असल्याचे आढळून आले आहे.

डेन्मार्कमधील अरहूस विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केले. संशोधकांनी कॉफी या पेयामधील एक घटक शोधला असून, तो पेशींची कार्ये आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यामध्ये मदत करतो. प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या उंदरावरील प्रयोगात हे स्पष्ट झाले. या शोधामुळे नवीन ओषध तयार करण्यात मदत होणार असून, मधुमेह होण्यापासून बचाव करणे शक्य होणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.

मागील अभ्यासामध्ये कॉफीमधील कॅफेस्टोल ज्या वेळी शरीरामध्ये साखरेची पातळी वाढते त्या वेळी स्वादुपिंडातील पेशींमध्ये इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यास सुरुवात करतो. कॅफेस्टोल स्नायू पेशींमध्ये ग्लुकोजची पातळी वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे त्याचा वापर मधुमेहावर प्रभावी औषध म्हणून देता येऊ शकते.

संशोधकांनी अभ्यासामध्ये कॅफेस्टोल टाइप २ च्या मधुमेहाला रोखतो अथवा विलंब करतो असे तपासले. त्यांनी यासाठी टाइप २चा मधुमेह असलेल्यांचे तीन गट केले. यातील दोन गटांना कॅफेस्टोल देण्यात आले. १० आठवडय़ांनंतर कॅफेस्टोल देण्यात येणाऱ्या उंदरांच्या रक्तामध्ये ग्लुकोजची पातळी कमी दिसून आली. तसेच त्यांच्यामध्ये इन्सुलिनची पातळी नियंत्रणात असल्याचे दिसून आले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2017 1:45 am

Web Title: coffee good for health 3
Next Stories
1 जाणून घ्या ‘आयफोन ८’ च्या डिस्प्लेची किंमत
2 सॅमसंगचा बहुप्रतिक्षीत गॅलेक्सी नोट ८ पुढील आठवड्यात होणार लाँच
3 खोबरेल तेलाचे फायदे, ‘या’ १० टिप्स तुमचे सौंदर्य खुलवण्यास मदत करतील
Just Now!
X