फ्रेशर्स पार्टी, फ्रेंडशीप डे, फेस्टिव्हल्स आणि असं बरंच काही.. महाविद्यालयाच्या नवलाईचे दिवस उत्साही, रिफ्रेिशग करण्यासाठी मूडही तसाच हवा. हा मूड तयार करण्यात कपडय़ांचा मोठा सहभाग आहे. नव्याने कॉलेज सुरू झाल्यावर आपली ओळख तयार करण्यासाठी काही हटके पर्याय धुंडाळणे, नवे काही ट्राय करणे गरजेचे आहे. पलाझो, वनपीस, स्कर्ट्स, क्रॉप टॉप्स, जॅकेट्स आणि श्रग्स, स्कार्फ, स्टोल्स यातून आपली ‘मिक्स अँड मॅच’ स्टाईल निश्चित करू शकतो.

महाविद्यालये सुरू झाली आहेत. नव्या ओळखी होत आहेत, जुन्या मित्रमंडळींच्या भेटीगाठी होत आहेत. सगळीकडे मस्त, चीअरफुल वातावरण आहे. वेगवेगळे ‘डे’ज, फेस्टिव्हल्स यांचे वेळापत्रकही सेट आहे. नव्याचा हा उत्साह टिकवण्यात आणि वाढवण्यात कपडय़ांची भर पडते. आपण वेगळे, छान कसे दिसू याचा शोध प्रत्येकजण घेऊ लागला आहे. नवनवीन, फॅशनेबल आणि ट्रेंडी वेअरची दुकाने आणि ब्रँड्स भुरळ पाडण्यासाठी सज्ज आहेत. मुलींसाठी तर बाजारात भरपूर पर्यायही उपलब्ध आहेत. महाविद्यालयांत रोज कॅज्युअल प्रकारातले कपडेही चालू शकतात. जीन्स, टॉप, टी-शर्ट या नेहमीच्या आऊटफीट बरोबरच आता जेगीन्स, अँकल लेन्थ लेगीन्स, पलाझो, हॅरम यांनाही पसंती मिळत आहे. रॅपराऊंड किंवा क्रेपचे स्कर्ट्सही बाजारपेठेत टिकून आहेत. पलाझो, लेगीन्स आणि स्कर्ट्सवर लांब कुर्ता हा ट्रेंड सध्या सगळीकडे दिसतो आहे.

sensex today
Sensex Today: बाजार उघडताच सेन्सेक्सची उसळी; गाठला ऐतिहासिक उच्चांक!
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल
Fire building Mulund
मुंबई : मुलुंडमध्ये व्यवसायिक इमारतीला आग, ४० ते ५० जणांची सुटका

फ्लोरल डिझाईनला पसंती

लाँग स्कर्ट किंवा शॉर्ट स्कर्ट व त्यावर एखादा सिक्वेलचा टॉप हे मस्त कॉम्बिनेशन दिसू शकतं. कॉलेजमधल्या एखाद्या छोटेखानी कार्यक्रमासाठी असे सिक्वेलचे टॉप्स छान वाटू शकतात. शॉर्ट कुर्ती हा हल्लीच्या मुलींना आवडणारा प्रकार आहे. टॉप्स किंवा कुर्तीजमध्ये फ्लोरल डिझाईनची सध्या क्रेझ आहे. आणखी एक प्रकार तरुणींसाठी बाजारात आला आहे, तो म्हणजे कोऑíडनेट्स. दोन पीसचा हा सेट असतो. त्यात पँट, पलाझो आणि वर एखादा क्रॉप टॉप किंवा ऑफशोल्डर टॉप असे मस्त कॉम्बिनेशन केलेले असते. पूर्वी बेल बॉटम पॅन्ट्स असायच्या. हल्ली बेल स्लिव्ह्जचे टॉप्स पाहायला मिळतात. स्टाईल आणि लूक यासाठी असे वेगळे टॉप्स घ्यायला हरकत नाही. त्याशिवाय केप टॉप्स, ट्रान्सपरंट टॉप्स विथ स्पेगेटी, शिफॉन स्कर्ट्स असेही अनेक पर्याय मुलींसमोर उपलब्ध आहेत.

थोडे ट्रॅडिशनल आऊटफीट हवे असेल, तर सॅटीनच्या फ्लोअर लेन्थ कुर्तीज किंवा फ्लोअर लेन्थ अनारकलीजही घालता येतील. ट्रॅडिशनल िपट्रचे पलाझोही उत्तम पर्याय ठरू शकतात. डिझायनर वनपीसही ट्रॅडिशनल लूकसाठी घालता येऊ शकतात. साधाच कुर्ता आणि लेगीन्सवर बाटीक, पॅचवर्क, भरतकाम किंवा हँड पेंटिंग केलेली स्टोल हटके परंतु ट्रॅडिशनल लुक देऊ शकते.

बाजारात असे अनेक पर्याय उपलब्ध असताना गोंधळ उडणे सहाजिक आहे. मात्र एखादा ड्रेस नुसताच आवडला म्हणून घेण्यापेक्षा आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल, चांगल्याप्रकारे कॅरी करता येतील असेच कपडे निवडणे गरजेचे आहे.

क्रॉप टॉप्सची फॅशन

वनपीससुद्धा अलीकडे पुन्हा दिसू लागले आहेत. अगदी रोज वापरायला नाही, पण एखाद्या पार्टीसाठी, फेअरवेलसाठी हा पर्याय उत्तम ठरू शकतो. क्रॉप टॉप्स किंवा ऑफ शोल्डर टॉप्स ही सध्या भाव खाऊन आहेत. त्यात एखादी स्पेगेटी घातली, तर हे टॉप्स अगदी रोज वापरायलाही सुटसुटीत ठरू शकतात. श्रग्स हे तर अतिशय लाडके आऊटफीट आहे. कोणत्याही टॉपवर, कुर्तीवर श्रग्स जरा हटके लुक देऊ शकतात. नेटेड, ट्रान्सपरंट, रंगीत, चिकन, होजिअरी असे विविध प्रकारच्या कपडय़ांत श्रग्सचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यात शॉर्ट, अँकल लेन्थ, पार्टीवेअर, फ्लोरल असेही काही प्रकार आहेत. राजस्थानी किंवा काश्मिरी भरतकाम केलेली जॅकेट्स, खादीची जॅकेट्स प्लेन कुर्ता, स्कर्ट्स यावर उठावदार दिसतात.