वेदनादायी प्रक्रिया न वापरता गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान करणारे यंत्र भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. त्याची किंमतही परवडणारी आहे. नॉर्थ कॅरोलिनातील डय़ूक विद्यापीठात निम्मी रामानुजम व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केले आहे.  पॉकेट कोल्पोस्कोप नावाचे हे यंत्र असून ते लॅपटॉप व मोबाइल फोनला जोडता येते, त्यामुळे महिला स्वत:च ही चाचणी काही माहितीच्या आधारे करू शकतात. रामानुजम यांनी खिशात मावेल असे उपकरण तयार केले असून त्याची चाचणी १५ जणांवर घेण्यात आली. त्यात गर्भाशय मुखाच्या स्पष्ट प्रतिमा मिळाल्या आहेत. रामानुजम यांच्या मते गर्भाशय मुखाच्या कर्करोगात मृत्युदर शून्य असायला हवा, कारण आता अनेक साधने उपलब्ध आहेत; पण तसे होत नाही, कारण आताची उपकरणे साधी सोपी नाहीत. क्लिनिकमध्ये एकदा कोल्पोस्कोपी केली, की नंतर पुढे पाठपुरावा राहात नाही. त्यामुळे आता महिलाच कोल्पोस्कोपी करू शकतील. सध्या स्पेक्युलम या धातूच्या यंत्राद्वारे गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासला जातो. त्याला कोल्पोस्कोप म्हणतात, पण आम्ही तो वेगळ्या पद्धतीने तयार केला आहे, त्याला कुशलता लागत नाही. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या मदतीने खिशात मावेल अशा आकाराचे नवे कोल्पोस्कोप यंत्र तयार केले असून त्यात एका बाजूला प्रकाश व कॅमेरा आहे. २०१७ च्या अखेरीस या यंत्राच्या उत्पादनास मान्यता मिळणार आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग महिलांमध्ये चौथ्या क्रमांकावर असून वर्षांला ५ लाख महिलांना हा कर्करोग होतो. अमेरिकेत त्याचे प्रमाण वर्षांला १०००० आहे; त्यातील चार हजार महिला वर्षांला मरतात. मात्र तरीही, चार दशकांत या कर्करोगाने मृत्यूचे प्रमाण ५० टक्के कमी झाले आहे.

Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”