News Flash

इंग्लिश सुधारायचंय? मग हे वाचा

इंग्लिश भाषेमधले गोंधळात टाकणारे शब्द

इंग्लिशची भीती मनातून काढून टाका

इंग्लिश येणं ही आता एक अतिशय गरजेची गोष्ट झाली आहे. पूर्वी फक्त पेपरा-पुस्तकात असणाऱ्या इंग्लिश भाषेने स्मार्चटफोन युगात आपल्या रोजच्या जीवनाचा ताबा कधी घेतला हे कळलंच नाही. अर्थात मातृभाषा शिकण्याचं महत्त्व जराही कमी झालेलं नाही. पण त्याजोडीला इंग्लिश येत नसेल तर काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता असते.

नोकरीसाठी अर्ज करताना तर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुमच्या बायोडेटामध्ये असणारी इंग्लिश ग्रामरची एखादी चूक किंवा एखादा स्पेलिंग एरर तुमचं इंप्रेशन खराब करू शकतो.

कितीतरी इंग्लिश शब्दांचा उच्चार आणि त्यांचं स्पेलिंग जवळजवळ सारखंच असतं पण त्यांच्या अर्थांमध्ये फरक असतो. अशी गडबड टाळायची असेल तर पुढच्या काही शब्दांच्या जोड्या वाचा

१. Affect (अफेक्ट) आणि  Effect (इफेक्ट)

हे दोन शब्द एकसारखेच वाटले तरी ते वेगवेगेळे आहेत.

‘Affect’चा अर्थ परिणाम करणं तर Effect चा अर्थ परिणाम होणं

२. it’s आणि its

या दोन्ही शब्दांमध्ये नेहमी गल्लत केली जाते अनेकदा सगळ्यांना वाटतं की हे दोन्ही शब्द एकच आहेत. पण तसं न होता या दोन्ही शब्दांचे वेगवेगळे अर्थ आहेत. it’s हा शब्द ‘it is’ चं छोटं रूप म्हणून वापरला जातो तर its हा शब्द ‘त्याचा/त्याची/त्याचे’ अशा अर्थाने वापरतात. उदा. ‘बाळ त्याच्या खेळण्यांशी खेळत आहे’ याचं भाषांतर करताना ‘The baby is playing with its toy’ असं लिहितात. तर ‘आज पाऊस पडतोय’ या वाक्याचं भाषांतर करताना ‘It’s raining today’ असं लिहिलं जाईल. दुसऱ्या वाक्यामधल्या  it’s चा वापर it is अशा अर्थाने केला गेला आहे.

३. Expect/ except/accept

या शब्दांचे उच्चार जवळचे असल्याने त्यांच्यामध्ये गोंधळ होणं साहजिक आहे. Expect (एक्सपेक्ट) म्हणजे ‘अपेक्षा करणे’, Accept (अॅक्सेप्ट) म्हणजे ‘स्वीकार करणे’ आणि Except (एक्सेप्ट) म्हणजे ‘…च्याशिवाय’

४. Breath/Breathe

‘Breath’ म्हणजे श्वास. हे नाम आहे. तर श्वास घेण्याच्या प्रत्यक्ष क्रियेला ‘Breathe’ किंवा ‘Breathing’ म्हणतात.

५. Principal/Principle

Principal म्हणजे मुख्याध्यापक तर Principle म्हणजे तत्व. न्यूटनचा सिध्दांत याचं इंग्लिश भाषांतर Newton’s Principle असं होतं.

फिरले का डोळे? अशा अजून ३० आणखी जोड्या देता येतील. ‘English is a very funny language’ असं म्हटलं जातं ते खरंच आहे. पण काही मोजक्या बारीक गोष्टी लक्षात ठेवल्या तर ही भाषा आत्मसात करणं कठीण नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 12:30 pm

Web Title: commonly confused words in english
Next Stories
1 तुमच्या स्मार्टफोनमधला डेटा सुरक्षित आहे का?
2 Healthy living: स्वयंपाकाच्या गॅस-शेगडीची ज्योत तपासा
3 ट्रेण्ड : ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी’च्या नावानं चांगभलं
Just Now!
X