30 May 2020

News Flash

एअरटेल vs जिओ vs व्होडाफोन : 300 पेक्षा कमी रुपयांचा प्रीपेड प्लॅन, कोणता आहे बेस्ट?

टेलिकॉम कंपन्यांच्या या प्लॅनवर नजर मारल्यास सगळे प्लॅन जवळपास सारखेच वाटतात. पण...

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या अधिकाधिक फायदे असलेले प्लॅन आणत आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या या प्लॅनवर नजर मारल्यास सगळे प्लॅन जवळपास सारखेच वाटतात. पण, काही ठरावीक प्रीपेड प्लॅनवर टेलिकॉम कंपन्या सर्वाधिक लक्ष केंद्रीत करत असतात. 299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा त्यातीलच एक आहे. एअरटेल, रिलायंस जिओ आणि व्होडाफोन (आयडियाकडे काही सर्कलमध्ये) या तिन्ही कंपन्यांचा 299 रुपयांचा प्लॅन आहे. तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये विविध ऑफर्स आहेत. एअरटेलच्या 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप मिळते. तर, रिलायंस जिओच्या 299 च्या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटाचा अधिक वापर करता येतो आणि व्होडाफोनच्या प्लॅनमध्ये 70 दिवसांची वैधता आहे.जाणून घेऊया काय आहे तिन्ही कंपन्यांच्या प्लॅनमधील फरक –

एअरटेल 299 रुपये प्लॅन –
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा मिळतो. डेटाशिवाय अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा फायदाही आहे. 28 दिवस या प्लॅनची वैधता आहे. यामध्ये युजर दररोज 100 SMS पाठवू शकतात. या प्लॅनमध्ये एअरटेलकडून ग्राहकांना 129 रुपयांची अॅमेझॉन प्राइमची एका महिन्याची मेंबरशिप मोफत मिळते. त्यामुळे ज्यांना अॅमेझॉनची मेंबरशिप मोफत घ्यायची असेल, अशांसाठी एअरटेलचा हा प्लॅऩ उत्तम पर्याय आहे.

रिलायंस जिओ 299 रुपये प्लॅन-
रिलायंस जिओच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना शानदार फायदे मिळतात.यामध्ये ग्राहकांना दररोज 3GB इंटरनेट डेटा मिळतो. डेटाशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा देखील मिळेल. 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये जिओ सिनेमा, जिओ TV यांसारख्या Jio च्या सर्व अॅपचा वापर करता येतो.

व्होडाफोन 299 रुपये प्लॅन-
या प्लॅनमध्ये ग्राहकांना अधिक वैधता मिळते. 70 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह एक हजार एसएमएस आणि 70 दिवसांच्या वैधतेसह 3GB 3G/4G डेटा वापरायला मिळतो. याशिवाय व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये व्होडाफोन-प्ले या मोबाइल अॅपचा मोफत वापर करता येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 2:30 pm

Web Title: comparison between airtel jio and vodafone prepaid plans sas 89
Next Stories
1 Facebook ने लाँच केलं म्युझिक फिचर, जाणून घ्या काय आहे विशेष?
2 Motorola स्मार्ट टीव्ही भारतात लाँच, किंमत 13 हजार 999 रुपयांपासून सुरू
3 आता स्क्रीनशॉटद्वारे करता येणार Google Search
Just Now!
X