दर वर्षी 70 लाखाहून अधिक पर्यटक सांता मोनिकाला भेट देतात,  कारण ही (नॅशनल जिओग्राफिकच्या टॉप टेनमधली एक) अशी प्रसिद्ध बीच सिटी आहे तसेच, ती लॉस एंजेलिसच्या इतर आकर्षणांपासून जवळ आहे. सांता मोनिकाच्या समुद्र किनार्‍यांवर 300 पेक्षा अधिक दिवस सूर्यप्रकाश चमकतो आणि वेस्ट कोस्टवरील काही सुरेख सूर्यास्त इथून पाहता येऊ शकतात. सांता मोनिका ही पायी फिरण्यासाठी आणि सायकलवरून फिरण्यासाठी अतिशय उत्तम जागा आहे, त्यामुळे इथं आसपास दुकानं, रेस्टॉरंट्स, सांता मोनिका पिअर आणि थर्ड स्ट्रीट प्रोमिनेडसारखी ठिकाणे फिरण्यासाठी खूप सोपे आहे.

सांता मोनिकाला कसे पोहोचावे –

सांता मोनिका हे ग्रेटर लॉस एंजेलिसमध्ये वसलेले असून, या शहराला सार्वजनिक वाहतूक सेवा, विमान किंवा कारने पोहोचणे सोयीस्कर आहे.

विमानतळ –

सांता मोनिकापासून केवळ आठ नॉन फ्रीवे मैलांवर लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळ (एलएएक्स) असून हा सर्वात जवळचा विमानतळ आहे, इथून शहरात येण्यासाठी थेट बस सेवा, शटल आणि इतर वाहतूक सेवा उपलब्ध आहे. एलएएक्स आणि सांता मोनिका मधील शटलचे दर साधारणपणे एका फेरीसाठी $15 आणि दोन्ही फेरींसाठी प्रति व्यक्ती $30-40 असे आहेत.

सार्वजनिक वाहतूक

सेवा सांता मोनिका वाहतूक सेवेमध्ये सार्वजनिक सुविधा असून लॉस एंजेलिस भागामधील इतर सुविधांसोबत त्यांचे मार्ग वापरले जातात, त्यामुळे फिरणे अधिक सुलभ बनते.

फिरण्यासारखी ठिकाणे

सांता मोनिका हे अतिशय सुरेख असे बीच शहर असून त्यामध्ये फिरण्यासारखे बरेच काही आहे. या शहरात अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. तुमचे फिरण्याचे वेळापत्रक तुम्हाला हवे तसे भरगच्च किंवा सोपे असू शकते- दिवसभरामध्ये म्युझियम बघत आणि जागतिक दर्जाचे शॉपिंग करत भटका किंवा बीचवर निवांत पडून या जगाचा आनंद घ्या.

1. सांता मोनिका बीच सांता मोनिकाचा लांबलचक रूंद समुद्रकिनारा इतर दक्षिण कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनार्‍यांपासून वेगळा आहे कारण इथे करण्यासारखे बरेच काही आहे. वाळू आणि समुद्र दोन्ही स्वच्छ सुंदर असून इथे बीचभटकंती, स्विमिंग, सर्फिंग करता येऊ शकते. पण इतकेच नाही, तर इथे द मार्विन ब्रॉड बाइक ट्रेलवरून सायकल घेऊन भटका, जिथे तुमच्या कानांमध्ये वारा भरेल आणि लाटांचा आवाज सतत निनादत राहील. समुद्रकिनारी बुद्धीबळ खेळा, किवा बीच व्हॉलीबॉलचा आनंद घ्या, किंवा अॅनेनबर्ग कम्युनिटी बीच हाउसमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक आउटडोअर अ‍ॅक्टीव्हीटीचा आस्वाद घ्या. दिवसभर मस्ती करून झाल्यानंतर सांता मोनिकाच्या सर्वात सुरेख आकर्षणाचा आनंद घ्या- समुद्रकिनार्‍यावरील निवांत सूर्यास्त.

2. सांता मोनिका पिअर सांता मोनिकाचे नाव घेताक्षणीच, सांता मोनिका पिअरचे चित्र नजरेसमोर नक्कीच येते. याचे लाल आणि पिवळ्या रंगाचा आकाशपाळणा हे या शहराचे जणू प्रतीक आहे. या पिअरमध्ये पॅसिफिक पार्क हे संपूर्ण सुविधा असलेले करमणूक पार्क आहे, तसेच अनेक रेस्टॉरंट्स, बार्स आणि भेटवस्तूंची दुकाने आहेत. याचसोबत इथे 200 हून अधिक गेम्स असलेला एंटरटेनिंग आर्केड देखील आहे. पॅसिफिक पार्कमधील सौर ऊर्जेवर चालणारा आकाशपाळणा हे इथले खास आकर्षण आहे. दिवसा, इथल्या ऐतिहासिक लूफ हिप्पोड्रोम कॅरोसेलमध्ये फिरा, रस्त्यावर कलाकारी दाखवणारे लोक बघा, अथवा निवांत बुढ्ढी के बाल खात भटका. मलिबु आणि साऊथ बे चे नजारे बघत संध्याकाळी हातात एखादी बीअर घेऊन फिरा. सूर्यास्तानंतर जर इथंच थांबलात तर कदाचित तुम्हाला लाटांच्या आवाजासोबत लाईव्ह संगीताचा आनंद घेता येईल. सांता मोनिका पिअर हे सांता मोनिकाचे खास आकर्षण असून, या एका भेटीमध्ये सर्व वयाच्या आणि कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासाठी सांता मोनिका हे खास ठरते.

3. शॉपिंग खरेदी करायची आहे? जवळपासच्या अनेक शॉपिंग भागामध्ये फिरा, मस्त सेल्स आणि डिझायनरची नावे ही अगदी हाताच्या अंतरावरती आहेत. तुम्हाला ब्रॅंड्स हवे आहेत की ग्लोबल कुटूर, सारे काही इथे मिळू शकेल. पण सांता मोनिकाची खरेदी खर्‍या अर्थाने वेगळी ठरते ती शहराची कॅज्युअलई सोफिस्टीकिटेड स्टाईल जपणारे अनेक स्वतंत्र बूटिकमधली खरेदी. मॉन्टाना एव्हेन्यूवरच्या ल्युसी, स्प्लेंडिड, रुती, सायट्रॉन यासारख्या छोट्या दुकानांमधून ते सांता मोनिका प्लेसवरच्या ब्लूमिंग़डेल आणि नॉर्डस्ट्रॉम सारख्या दुकानांपर्यंत (थर्ड स्ट्रीट प्रॉमेनेडबद्दल तर बोलायलाच नको) तुम्हाला खरेदीसाठी अनेक पर्याय सापडतील.

4. कला आणि संस्कृती सांता मोनिकामध्ये 75 हून अधिक संग्रहालये आणि कला गॅलरीज आहेत. हे तर स्पष्टच आहे की, कला आणि संस्कृतीसाठी हे शहर आदर्श आहे. सार्वजनिक कला आणि शिल्पे तसेच रस्त्यावरील कलावंत पाहता, हे लक्षात येते की, सांता मोनिकाची कला ही चार भिंतीत लपलेली नाही. सांता मोनिकामध्ये आवर्जून पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे, न्युयॉर्क सिटीमध्ये असलेल्या गॅलरीची शाखा एल अँड एम आर्ट्स, बर्गामोट (रेल्वेची जुनी शेड ज्यामध्ये 35 गॅलरीज आहेत). जर तुम्ही उन्हाळ्यात भेट देत असाल तर लाईव्ह कार्यक्रम, शेतकरी बाजार, आउटडोअर संगीत कार्यक्रम यासाठी इव्हेंट्स कॅलेंडर अवश्य तपासा. कला आणि संस्कृतीमधले वैविध्य आणि अनेक सुरेख रेस्टॉरंट्स यामुळे सांता मोनिका हे स्थानिक आणि पर्यटक दोघांसाठीही अतिशय आदर्श असे फिरायला जायचे ठिकाण आहे.

5. नाईटलाईफसूर्यास्तानंतर इथं थांबलात तर तुम्हाल समजेल की हे शहर अंधारात कशा प्रकारे बदलते. एलए भागातील सारे स्थानिक सांता मोनिका भागाकडे येतात कारण, इथे प्रसंग काहीही असो पण पायी चालत फिरणे आणि कॅज्युअल संभाषण यामुळे प्रत्येक संध्याकाळ ही अविस्मरणीय ठरते. हॉटेल शांगरीला च्या ओएनवायएक्स किंवा सांता मोनिका प्लेसमधल्या सोनोमा वाईन गार्डन यांसारख्या एखाद्या पॅसिफिक महासागराकडे असलेल्या रूफटॉप बारच्या हॅपी हवरने सुरूवात करा आणि रात्रीची अखेर सर्कल बार किंवा बार कोपामध्ये नाचत करा. किंवा चेझ झे सारख्या डाईव्ह बारच्या काऊंटरवर बसून रात्रीचा आस्वाद घ्या.

सांता मोनिकामधली जेवण्याची ठिकाणे 

सांता मोनिकाचा आकार पाहता, इथे पर्यटकांना रेस्टॉरंटमध्ये अनेक प्रांतवार, किमती आणि वातावरण यामध्ये वैविध्य पहायला मिळू शकते. सांता मोनिकामध्ये अनेक बाहेर जेवायला जायची ठिकाणे आहेत आणि आमच्या पाककृती या वैविध्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय आहेत.

1. कॅलिफोर्निया फ्युजन सांता मोनिका हे केवळ जेवायला जाण्याचे उत्तम ठिकाण नाही, तर हे आंतरराष्ट्रीय डायनिंग डेस्टीनेशन असून “कॅलीफोर्निया” आणि “फ्युजन” या पाककृतीचा जन्म या ठिकाणी झाला आहे, यामध्ये वेगवेगळे स्वयंपाकाचे प्रकार आणि ताजे ऑरगॅनिक साहित्य वापरून स्वयंपाक केला जातो.

2. शेतातून थेट ताटात सांता मोनिका हे आधीपासून स्थानिक अन्नासाठी पाठिंबा देत असून ही मोहिम आता मुख्य धारेमध्ये आलेली आहे. यामध्ये शाश्वत, ऑरगॅनिक साहित्य वापरून शहरामधील महत्त्वाचे शेफ स्वयंपाक बनवतात.

3. आरोग्यपूर्ण सांता मोनिका परिसरामध्ये तुम्हाला अनेक अशी नवनवीन रेस्टॉरंट्स दिसतील जिथे स्थानिक ऑरगॅनिक साहित्य वापरून शाकाहारी आणि व्हेगन स्वयंपाक केला जातो, यामुळे तुमच्यासाठी आरोग्यदायी असलेले पर्याय चवीलादेखील तितकेच उत्तम असतात.सांता मोनिकामध्ये राहण्याची ठिकाणे सांता मोनिकामधील सर्व हॉटेल ही समुद्रापासून चार मैल अंतरावर आहेत, आणि त्यामुळे बीचवर चालत जाणे अत्यंत सोयीचे आहे.

सांता मोनिकाच्या हॉटेल्समध्ये लक्झरीपासून ते बजेटपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध असून, ग्रेटर लॉस एंजेलिससाठी हे मध्यवर्ती भागामध्ये आहे. सांता मोनिका हॉटेल हे लॉस एंजेलिस एअरपोर्ट (एलएएक्स), डाउनटाउन एलए आणि हॉलीवुडपासून देखील जवळ आहेत. सांता मोनिका मध्ये 40 हून अधिक हॉटेल समुद्रकिनार्‍यावर आहेत. सांता मोनिकामध्ये राहण्याचा सर्वात मोठा फायदा आहे की, समुद्राचे सुरेख नजारे, स्थानिक संस्कृती आणि हॉलीवुडचे दिग्गज इथे तुम्हाला वारंवार फिरताना दिसणे.