03 August 2020

News Flash

तुम्हाला सतत व्याकरणाच्या चुका काढण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा कारण…

सतत व्याकरणाच्या चुका काढणाऱ्यांना इंटरनेटच्या भाषेत 'ग्रामर नाझी' असं म्हणतात

व्याकरण

अनेकदा आपण व्याकरणाच्या चुका दुरुस्त करणारे पुणेकर या विषयावरील विनोद वाचतो. मात्र खरोखरच लिहिताना अनेकदा चुका होतात. मात्र जितक्या चुका होतात त्या दाखवणारेही तितकचे असतात. अनेकांना व्याकरणातली एकही चूक सहन होत नाही. समोरच्याला केवळ चूक दाखवून न देता त्याला अनेकदा ‘व्याकरण सुधर’ असा सल्लाही दिला जातो. अनेकदा चूक करणारे ऐकून घेतात पण पुन्हा अशीच एखादी चूक करतात अन् या व्याकरणप्रेमींच्या कचाट्यात सापडतात. सोशल नेटवर्किंगवरही अनेकजण स्टेटसखाली कमेंट करुन दुसऱ्यांच्या व्याकरणातील चूक दाखवतात. अशा लोकांना इंटरनेटच्या भाषेत ‘ग्रामर नाझी’ असं म्हणतात. मात्र अशापद्धतीने सतत व्याकरणाच्या चुका दाखवणे हा मानसिक आजार असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

मानसोपचारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सतत एकच क्रिया अनेकदा करण्याची प्रवृत्ती एखाद्या व्यक्तीमध्ये निर्माण झाल्यास तिला ऑब्सेसिव्ह कंपल्सरी डिसॉर्डर म्हणजेच वैद्यकीय भाषेत ओसीडी हा आजार होतो. ओसीडीमध्ये एकच काम व्यक्ती पुन्हा पुन्हा करत असते. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादी गोष्ट सतत करण्याची इच्छा होणे म्हणजे ओसीडी. व्याकरणाच्या चुका दुरुस्त करण्यालाही हा नियम लागू होतो. चर्चा कशावर सुरु आहे, समोर कोण आहे, विषय काय आहे याचा विचार न करता काहीजण सतत व्याकरणातील चूका शोधत असतात. हा खरं मानसिक आजाराचा भाग आहे असं डॉक्टर सांगतात. ‘सातत्याने व्याकरण दुरूस्त करण्याची सवय असणे हे ऑब्सेसिव्ह कंपल्सरी डिसॉर्डरचं लक्षणं असू शकतं,’ अशी शक्यता शीव रुग्णालयातील मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. निलेश शाह यांनी ‘माय मेडिकल मंत्रा’ या आरोग्यविषय वेबसाईटशी बोलताना व्यक्त केली आहे.

अनेकदा एखाद्या अनौपचारिक संवादामध्येही व्याकरणाच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न काहीजण करतात. अशावेळी संभाषण अनौपचारिक असल्याने आपण असे वागायला नको होते असे त्यांना वाटत असते. मात्र व्याकरणाची चूक लक्षात आणून देण्याची सवय लागल्याने ते सतत चुकाच दाखवत असतात. आपल्या वागण्याने इतरांना त्रास होत असल्याची जाणीव झाल्यानंतरही अनेकांना चुका दाखवणे थांबवता येत नाही. यामधून आपल्यातच काहीतरी दोष असल्याची भावनाही अशा लोकांमध्ये निर्माण होते आणि ते स्वत:च उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. मात्र असे न करता योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 3:34 pm

Web Title: compulsive desire to correct grammar is mental illness called as ocd scsg 91
Next Stories
1 ‘वाट’ लावणारा ‘वात’ ! सांधेदुखी दूर ठेवण्यासाठी…
2 असे राखा कुरळ्या केसांचे सौंदर्य
3 TikTok ला टक्कर देण्याचा गुगलचा प्रयत्न, ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप खरेदी करण्याची तयारी
Just Now!
X