20 September 2020

News Flash

दिवाळीत सलग ५ दिवस बँका बंद

एटीएममध्येही खडखडाट होण्याची शक्यता

दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवारी ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आणि त्यानंतर शुक्रवारी ९ तासखेला भाऊबीज असल्याने बँका बंद असतील. तर १० तारखेला दुसरा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी आहे. त्यानंतर ११ नोव्हेंबरला रविवार असल्याने पुन्हा बँका बंद असतील. त्यामुळे तुमची काही महत्त्वाची कामे असल्यास ती आताच करुन घ्यावीत. अन्यथा दिवाळीनंतर बँकांमध्ये एकच गर्दी होण्याची शक्यता आहे. ५ दिवस सलग सुटी होऊन लोकांची चांगलीच तारांबळ होऊ शकते.

दरम्यान बँकांना सलग ५ दिवस सुट्टी असल्याने एटीएममध्येही खडखडाट होऊ शकतो. त्यामुळे एटीएममधूनही वेळीच काढून ठेवायला हवेत असे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय किंवा इतर तातडीच्या खर्चांसाठी लागणारे पैशांची आधीच तजवीज केल्यास ऐन दिवाळीच तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. दिवाळीत ट्रीपला जाणाऱ्यांची संख्याही जास्त असते. बाहेरगावी गेल्यावर लागतील तसे एटीएममधून पैसे काढू असे आपण म्हणतो. पण दिवाळीमुळे बँकांना असलेल्या सुट्ट्या लक्षात घेता असे करणे अडचणीचे ठरु शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 12:21 pm

Web Title: continue bank holiday in diwali be aware
Next Stories
1 इकबाल कासकरला व्हीआयपी वागणूक देणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन
2 Elgaar parishad case: अरुण परेरा आणि गोन्साल्विस यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
3 बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन
Just Now!
X