कोणत्याही औषधीच्या दुकानात सर्वाधिक विक्री होणाऱ्या गोळ्या या वेदनाशामक असतात. एकूण औषधांच्या तुलनेत वेदनाशामक गोळ्यांच्या विक्रीचे प्रमाण सुमारे ३० टक्के आहे. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत असल्या तरी त्या वापरताना सावधानता बाळगायला हवी. सतत वेदनाशामक गोळ्या घेतल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम शरीरातील इतर अवयांपेक्षा मूत्रपिंडावर होतो. त्यामुळे दुखणे कशाचे आहे, हे तपासून उपचार करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
वेदनाशामक गोळी आजार बरा करत नाही. शरीरातील एखादा अवयव दुखू लागला, की तेथून मेंदूला रसायनांच्या माध्यमातून संदेश पाठवले जातात. पॅरासिटेमॉल असलेल्या गोळ्या मेंदूकडे येणारे व तेथून जाणारे वेदनेचे संदेश अडवण्याचे काम करतात आणि त्यामुळे वेदना होत असल्याचे लक्षात येत नाही. आयबुप्रोफेन असलेल्या गोळ्या वेदना होत असलेल्या ठिकाणी काम करतात. वेदना उत्पन्न करणाऱ्या रसायनांवर नियंत्रण ठेवून दाह कमी होतो. वेदनाशामक गोळ्यांमुळे फायदा होतो, पण काही वेळा गंभीर परिस्थितीही निर्माण होते. या गोळ्या थेट घेता येत असल्या तरी त्यांची गुणशक्ती वेगवेगळी असते. शंभरातील एका रुग्णाला एखाद्या गोळीनेही त्रास होतो. अॅस्पिरीनमुळे हृदय तसेच मेंदूकडे जाणाऱ्या वाहिन्यांत ब्लॉकेज निर्माण होतात. काही वेळा जठराला ओरखडे पडून रक्तस्त्राव होतो. सांधेदुखीसाठी देण्यात येणाऱ्या ‘कॉक्स टू इन्हिबीटर’मुळे मोठय़ा आतडय़ांमध्ये अल्सर झालेले रुग्ण उपचारासाठी येतात. काही गोळ्यांमुळे मूत्रपिंडावर प्रभाव पडतो, अशी माहिती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील ज्येष्ठ पोटविकार तज्ज्ञ डॉ. सुधीर गुप्ता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
सांधेदुखी किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी होत असलेल्या वेदनेसाठी आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक उपयोगी पडतात. त्याचा परिणाम ८ ते १० तास असतो. या गोळ्या जेवणानंतरच घेणे योग्य असते. उपाशीपोटी कधीही घेऊ नये. कोणत्याही औषधीच्या दुकानात व केव्हाही या गोळ्या मिळत असल्याने अनेक नागरिक थोडी जरी वेदना झाली की त्याचे सेवन करतात. वेदना होत नसताना अधिक काळ या गोळ्या घेतल्यास पोट बिघडणे, रक्तस्त्राव व हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नये. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे आजार असलेल्यांनी औषधे स्वतच्या मनाने घेऊ नयेत यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
वेदनाशामक गोळी घेण्यापूर्वी वेदना नेमकी का होत आहे, आणि ते कारण कमी करता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. दुखणे हे नैसर्गिक असून ते लक्षण आहे. वेदनाशामक गोळी घेण्याचे कारणे डोकेदुखी, दातदुखी, अंगदुखी असू शकते. डोके दुखत असेल तर त्यामागे अपुरी झोप, सर्दी, ताण, उपवास अशी कारणे असू शकतात. गोळी तत्काळ दिलासा देत असली तरी मूळ कारणावर उपाय केला तर पुन्हा पुन्हा गोळ्यांकडे वळावे लागणार नाही. वेदनाशामक गोळी हा केवळ तात्पुरता उपाय आहे. सतत गोळ्या घेतल्याने त्याचा परिणाम मूत्रपिंड आणि मेंदूवरही होतो. खूप वेदना होत असल्यास डॉक्टरांकडे जाण्याच्या वेळेपुरते आराम पडावा यासाठीच त्याचा उपयोग करावा, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद सावजी व्यक्त केले.

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….