सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातलं आहे. करोनाच्या संसर्गामुळे अनेकांना प्राणदेखील गमवावा लागला आहे. यातच, याविषयी अनेक उलट-सुलट चर्चा रंगताना दिसतात आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो. डॉ. फईम युनुस यांनी करोना व्हायरस विषयी लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर केले आहेत. डॉ. फईम युनुस यांनी आपल्या ट्वटरवर लोकांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. फईम युनुस यांची पोस्ट सध्या चांगलीच वहयरल होत आहे. या पोस्टचा मराठी अनुवाद येथे देण्याचा प्रयत्न केला आहे..

तर, करोना व्हायरस विषयी अनेक गैरसमज माझ्या कानावर येत असून, ते पटकन दूर करण्याचा मी प्रयत्न करतो.

१. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये करोना व्हायरस नष्ट होईल.

चूक, या आधीच्या अन्य विषाणुंनादेखील हवामान बदलाचा काहीही फरक पडला नाही. तसेच. जेव्हा आपण उन्हाळ्यात प्रवेश करतो, पृथ्वीच्या अन्य भागात हिवाळा असतो. हा व्हायरस जगभरात पसरलेला आहे.

२. डास चावल्याने व्हायरस उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पसरेल

चूक, याचा प्रादुर्भाव रक्तामुळे होत नसून, शिंक अथवा खोकल्यातून उडणाऱ्या तुषारांनी होतो. ज्याला इंग्रजीत respiratory droplets असं माहणतात. डासांमुळे याचा प्रसार होत नाही.

३. जर काहीही त्रास न होता तुम्ही दहा सेकंद श्वास रोखू शकलात, तर तुम्हाला करोना झालेला नाही.

चूक, अनेक करोनाबाधीत तरूण रुग्ण दहा सेकंदाहून अधिक काळ श्वास रोखून धरू शकतात, तर दुरऱ्या बाजूस अनेक वृध्द ज्यांना हा संसर्ग झाला नाही ते असं करण्यात असमर्थ ठरतात.

४. करोनाची टेस्ट उपलब्ध नसल्याने आपण रक्तदान करावे, त्यावेळी ब्लड बँकत त्याची टेस्ट होईलच.

कोणतीही ब्लड बँक करोना व्हायरसची टेस्ट करत नाही. त्यामुळे हा प्रयत्न व्यर्थ ठरेल. रक्तदान हे पवित्र कार्य आहे. चांगल्या कारणासाठी रक्तदान करयला स्वत:ला प्रवृत्त करुयात.

५. करोना व्हयरस घशात राहातो, म्हणून खूप पाणी प्यायल्याने तो पोटात जाईल आणि पोटातील आम्ल-पित्त त्याला नष्ट करेल.

व्हयरसचा घशामार्गे शरिरात प्रवेश होऊ शकतो. परंतू, एकादा शरिरात शिरल्यावर तो स्थानिक पेशींमध्ये संक्रमित होतो. त्यामुळे पाणी पिऊन त्याला घालवून लावता येत नाही. अधिक प्रमाणात पाणी प्यायल्याने तुम्हाला सारखे शैचाला
जावे लागेल.

६. एकमेकांपासून दूर राहा वगैरे हे जरा अतिच होतय. व्हायरसचा फार काही धोका नाही हे तुम्हाला दिसून योईल.

जर आपल्याला मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झालेला दिसत नसेल (मी आशा करतो) तर एकमेकांपासून दूर राहाणे काम करतंय हे याने सिध्द होईल.

७. कार अपघातात वर्षाकाठी हजारोंनी मरतात. करोनामध्ये असं काय मोठं आहे?

कार अपघात संसर्गजन्य नाही. दर तीन दिवसांत यात दुपटीने वाढ होत नाही, कार अपघातांमुळे मोठ्याप्रमाणावर चिंतेच वातावरण अथवा बाजार पडल्याचे दिसत नाही.

८. साबण आणि पाण्यापेक्षा हॅण्ड सॅनिटायजर उत्तम

चूक, साबण आणि पाण्यामुळे जंतू मरतात आणि पाण्याबरोबर त्वचेवरून धूऊन निघून जातात.

९. किटकनाशकाचा वापर करून आपल्या घरातील दरवाज्यांचे ‘नॉब’ स्वच्छ करणे हा करोनावरचा सर्वात चांगला उपाय आहे.

चूक, हात धूणे / ६ फूटाचे अंतर ठेवणे ह्या उत्तम सवयी आहेत. जोपर्यंत तुम्ही घरातच करोनाबाधीत व्यक्ती काळजी घेत नसाल, तोपर्यंत तुमच्या घरातील कोणताही पृष्ठभाग धोकादायक असू शकत नाही.

१०. अमेरिका अथवा चीनच्या सैन्याने (तमुच्या राजकीय समर्थनावर अवलंबून) मुद्दामहून करोना व्हायरस परसवला.

यावर, खरोखर??? असा प्रति प्रश्न डॉक्टरांनी विचारला आहे.

मित्रांनो, इथेच थांबतो. छान राहा. दयाळू राहा. विश्वास ठेवा. नंतर भेटूच. हा काळसुध्दा निघून जाईल..