Corona Kavach Mobile Application : दिवसेंदिवस देशात करोनाचा प्रदुर्भाव वाढतच आहे. भारतामध्ये करोना बाधितांचा आकडा ८७३ वर गेला आहे. तर आतापर्यंत देशात १७ जणांचा मृत्यू झाला. दिवसांगणिक करोना बाधितांच्या संखेत होत असलेली वाढ पाहून लोकांच्या मनात भितीचं वातावरण आहे. व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी मोदींनी लॉकडाउनची घोषणा केली आहे. नागरिकांना सोशल डिस्टेंसिंग आणि घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरात लॉकडाउन असल्यामुळे किराणा दुकान, भाजी मंडई, एटीएमसमोर लोकांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत. अशांमध्येच आपल्या जवळ असलेला व्यक्ती करोना बाधित तर नाही का? चाचणी केल्यानंतरच करोनाचा संसर्ग झाल्याचं समजते. पण सरकारनं नागरिकांसाठी खास मोबाइल अॅप तयार केलं आहे. त्या अॅपच्या मदतीनं आजूबाजूला करोना बाधित कोणी असेल तर समजेल. या अॅपचं नाव ‘कोरोना कवच’ असं आहे.

‘कोरोना कवच’ हे लोकेशन आधारित मोबाइल अॅप आहे. Android आणि iOS वापरणाऱ्यांसाठी याची इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयकडून तयार केलं आहे. या अॅपचे बिटा व्हर्जन गुगल प्ले स्टोरवर उपलबद्ध आहे. प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, हे अॅप आणखी प्रभावी करण्यावर केंद्र सरकारनं भर दिला असून त्यावर काम सुरू आहे.

लोकेशनवर आधारित असलेले ‘कोरोना कवच’ हे अॅप वापरकर्ता ज्या जागेवर जाणार डिटेक्ट करते. त्या लोकेशनवर जर एखाद्या करोना बाधिताच्या डेटाशी जुळला तर तुम्हाला लगेच अलर्टचं नोटिफिकेशन येईल. या अॅपमध्ये करोना बाधितांची लोकेशन जोडण्यात आली आहेत. त्या जागी जर अॅप वापरकर्ता गेल्यास अलर्ट तुम्हाला मिळे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus is there a corona patient near you find out from corona kavach mobile app government launched nck
First published on: 28-03-2020 at 12:04 IST