ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने करोना व्हायरसमुळे देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर काल (दि.२५) आपल्या सर्व सेवा बंद करत असल्याची घोषणा केली होती. पण, आता कंपनीने आपला निर्णय बदलला आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरक्षेबाबत हमी मिळाल्यामुळे कंपनीने आपल्या किराणा सामान व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा पुरवण्याच्या सेवा पुन्हा सुरू करत असल्याचं कंपनीने म्हटलंय. तर, अ‍ॅमेझॉनकडून अद्याप सरकारसोबत याबाबत चर्चा सुरू सुरू असल्याची माहिती आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून आम्हाला सामानाच्या होम डिलिव्हरीदरम्यान सुरक्षेबाबत आश्वसान देण्यात आलं आहे. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी ग्राहकांच्या सोयीसाठी, त्यांना जास्त समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी आम्ही आवश्यक सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. अशी माहिती फ्लिपकार्ट समूहाचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.

फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरही लवकरच परतणार आहोत, अशी माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, COVID-19 बाबत घ्यावयाची खबरदारी, विमानतळांवर स्कॅन झालेल्या प्रवाशांची आकडेवारी, बरे झालेल्या रुग्णांची माहिती, हेल्पलाइन नंबरसह अन्य विविध महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. तसेच, पेजवर FAQs नावाचे सेक्शन असून यामध्ये तुम्ही करोना व्हायरसबाबतचे प्रश्न विचारु शकता.