News Flash

Covid 19: मदतीसाठी पुढे आली MG Motor, कंपनी देणार दोन कोटी रुपये

कंपनीच्या कर्मचा-यांनी एकूण एक कोटी रुपये दान देण्याची घेतली शपथ...

गेल्या वर्षीच भारतीय ऑटो क्षेत्रात ‘एमजी हेक्टर’द्वारे एंट्री करणाऱ्या ‘एमजी मोटर’ने ( Morris garages) करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी मदतीची घोषणा केली आहे. कंपनीने वैद्यकीय मदतीसाठी दोन कोटी रुपयांचे सहकार्य करण्याची घोषणा केली.

एक कोटी रुपयांची मदत कंपनीद्वारे थेट रुग्णालयांना केली जाईल, तर अन्य एक कोटी रुपयांची मदत कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाणार आहे. ‘या मदतीत एक कोटी रुपये कंपनी प्रत्यक्ष दान करेल तर कंपनीच्या कर्मचा-यांनी एकूण एक कोटी रुपये दान देण्याची शपथ घेतली आहे. मदतीच्या सामग्रीत ग्लोव्ह्ज, मास्क, व्हेंटीलेटर, औषध आणि बेड इत्यादीचा समावेश असेल’, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

(“शाबास महिंद्रा, देशाच्या व्यवसाय क्षेत्राला अशाच दूरदृष्टी-नि: स्वार्थी नेतृत्वाची गरज!”)

“करोना व्हायरस या महामारीविरोधातील लढाईत एमजी मोटर इंडिया भारत सरकारसोबत आहे. एक सामाजिक व जबाबदार संस्था या नात्याने एमजी मोटर इंडियाने मेडिकल स्टाफ आणि समाजातील गरीब वर्गातील लोकांना उत्तम आरोग्य मिळावे, यासाठी गुरुग्राम आणि कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंगचे ठिकाण असलेल्या हलोल (वडोदरा) येथील सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थांना दोन कोटी रुपये दान करत आहोत” अशी माहिती कंपनीने दिली. तसेच, आम्ही डीलरशिप आणि वर्कशॉपमधील कर्मचा-यांच्या आरोग्याप्रती वचनबद्ध असून डीलर्सना देशभरातील सर्व कर्मचा-यांसाठी आरोग्य विमा काढण्याचं आवाहन करण्यात आल्याचंही कंपनीच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 2:53 pm

Web Title: coronavirus lockdown india mg motor announces rs 2 crore contribution to government hospitals and health institutions sas 89
Next Stories
1 Youtube च्या व्हिडिओ क्वालिटीला करोना व्हायरसचा ‘फटका’
2 करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू? जाणून घ्या फोटोमागची खरी कहाणी
3 CoronaVirus : “विराट, सचिन.. लाज वाटते की नाही..?”; नेटिझन्सचा सोशल मीडियावर संताप
Just Now!
X