News Flash

Honda च्या देशातील 155 डीलरशीप पुन्हा सुरू, कंपनीने केली घोषणा

118 शोरूम आणि 155 सर्व्हिस आउटलेट पुन्हा सुरू...

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात काही निर्बंध हटवल्यानंतर आता होंडा कार्स इंडिया लिमीटेडने (एचसीआयएल) आपल्या 155 डीलरशीप पुन्हा सुरू केल्या आहेत. स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक परवानगी घेतल्यानंतर या डीलरशीप पुन्हा सुरू करत असल्याची घोषणा कंपनीने बुधवारी केली. यामध्ये 118 ‘सेल्स आउटलेट’ आणि 155 ‘सर्व्हिस आउटलेट’चा समावेश आहे.

“ग्राहक व डीलरस्टाफची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी याला सर्वाधिक प्राधान्य असेल. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे सॅनिटायजेशन, सुरक्षा आणि सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची योग्य ती खबरदारी घेत आहोत”, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

डीलरशीपमध्ये ग्राहकांशी थेट संपर्क येऊ नये याची काळजी घेतली जाईल. प्रोडक्टची माहिती देण्यासाठी डीजीटल माध्यमांचा वापर केला जाईल. यासाठी सर्व विक्री आणि सर्व्हिस संबंधित आवश्यकतांसाठी ऑनलाइन संभाषण, प्रोडक्टची माहिती देण्यासाठी डीजीटल माध्यमांचा वापर याकडे मोठ्या प्रमाणात भर देण्यात येणार आहे. डीलरशीपमध्ये प्रवेश करताना, सर्व्हिससाठी कार स्वीकारताना, खरेदीपूर्व टेस्ट ड्राइव्हवेळी, आणि अखेरीस कार ग्राहकाला सोपवतानाही विशीष्ट प्रोटोकॉल म्हणजेच नियमांचे पालन करावे लागेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

“एचसीआयएलमध्ये, प्रत्येकाच्या सुरक्षेची खात्री आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी आम्ही आणि आमचे डीलर सॅनिटायजेशन, सुरक्षा आणि सोशल डिस्टन्सिंग यांची शोरूम आणि वर्कशॉप दोन्ही ठिकाणी काळजी घेत आहोत. डॉक्टर किंवा अत्यावश्यक सेवेमध्ये असलेल्या ग्राहकांच्या गाड्यांची किंवा ब्रेकडाउन व्हेइकलची सर्व्हिसिंग देण्याकडे आमच्या डीलरशीपचा भर असेल. आमच्या डीलरशीप ग्राहकांच्या सुरक्षित स्वागतासाठी तयार आहेत” असे कंपनीचे विक्री व विपणनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संचालक राजेश गोएल म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 4:53 pm

Web Title: coronavirus lockdown phase three honda cars india reopens 155 dealerships across country sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राजस्थान: चिंकाराला वाचवण्यासाठी ‘तो’ शस्त्रधारी शिकाऱ्यांना भिडला; बिष्णोई समाजासाठी ठरला हिरो
2 कौतुकास्पद ! पाकिस्तानातील हिंदू मंदिरात जाउन शाहिद आफ्रिदीचं अन्नदान
3 महाग झाले तीन ‘बजेट’ स्मार्टफोन, Xiaomi ने पुन्हा वाढवली किंमत
Just Now!
X