करोना विषाणूचा प्रसार देशामध्ये दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील करोनाग्रस्तांच्या संख्येने मंगळवारी ५०० चा आकडा ओलांडला. करोनामुळे देशभरामध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळेच ग्राहकांच्या वस्तू खरेदी करण्याच्या शैलीमध्ये बदल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. म्हणजेच गरजेच्या गोष्टींचा साठा करुन ठेवण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणे यामध्ये मॉल, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव यासारख्या सुविधा आठवडाभरापासून अधिक काळापासून बंद आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अनेकजण घरीच असल्याने अन्नधान्य आणि घरगुती वापराच्या वस्तूंचा साठा करण्याकडे अनेकांचा कलं आहे. मात्र मागील काही आठवड्यांपासून कंडोमच्या विक्रीमध्येही झपाट्याने वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मागील काही आठड्यापासून कंडोमची विक्री २५ ते ५० टक्क्यांनी वाढली आहे.

अनेकदा ग्राहक कमी प्रमाणात म्हणजेच कमी संख्येने कंडोम खरेदी करतात. मात्र मागील काही आठवड्यांपासून मोठ्या आकाराची पाकीटं खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढल्याचे औषध विक्रेते सांगतात. “सामान्यपणे लोकं तीन कंडोमचे पाकीट घेण्याला प्राधान्य देतात. मात्र मागील आठवडाभरापासून अधिक संख्येने कंडोम असणाऱ्या मोठ्या पाकीटांची मागणी वाढली आहे. १० ते २० कंडोम असणाऱ्या पाकिटांचा खप मोठ्याप्रमाणात वाढला आहे,” असं दक्षिण मुंबईमधील औषध विक्रेत्याने सांगितले. तर दुसऱ्या एका विक्रेत्याने अशापद्धतीने मागणी वाढणं चमत्कारीक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. “सामान्यपणे सणासुदीच्या काळात कंडोमची विक्री वाढल्याचे दिसून येते. खास करुन नवीन वर्षाच्या काळात कंडोमची विक्री वाढते. पण सध्या करोनाच्या भितीमुळे लोकं नेहमी लागणाऱ्या औषधांबरोबरच कंडोमचीही खरेदी करताना दिसत आहेत. मी माझ्याकडील कंडोमचा साठा २५ टक्क्यांनी वाढवला असल्याचं,” एका औषध विक्रेत्याने सांगितलं.

hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
Increase in number of cancer patients in India
भारताला कर्करोगाचा विळखा आणखी घट्ट! जाणून घ्या कोणत्या कर्करोगाचा धोका वाढला…
Average life expectancy of Indians
आनंदाची बातमी! भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात होतेय वाढ; जाणून घ्या कारणे…
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

नक्की वाचा >> गाडीमध्ये सेक्स करताना आढळलं जोडपं, करोनासंदर्भातील सरकारी आदेश मोडल्याप्रकरणी कारवाई

अनेक शहरांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. दिल्लीमधील एका औषध विक्रेत्याने मागील आठवड्याभरापासून गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचे निरिक्षण नोंदवलं आहे. “जे लोकं आधी कंडोमचं एक पाकीट न्यायचे ते आता दोन दोन पाकीटं घेऊन जातात. या गोष्टींचा खप मागील एक दोन आठवड्यांपासून बऱ्याच प्रमाणात वाढला आहे. खास करुन मॉल्स बंद झाल्यापासून या गोष्टी मेडिकलमधून खरेदी करण्याचे प्रमाण वाढलं आहे,” असं दिल्लीतील औषध विक्रेता सांगतो. काही दुकानदारांनी तर पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याचेही म्हटलं आहे. “ऑफिस आणि बाजार बंद असल्यापासून कंडोमच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे,” असं अनेक दुकानादार सांगताना दिसत आहेत.

नक्की वाचा >> साथीचा असाही परिणाम; ‘हे’ Extra Marital App डाऊनलोड करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण ७० टक्क्यांनी वाढले

पूर्वी कंडोम विकत घेताना भारतीयांना लाज वाटायची असं म्हटलं जातं. मात्र आता लैंगिक शिक्षण आणि माहितीचा प्रसार झाल्यामुळे अनेकांना कंडोमचे महत्व कळलं असून आता कंडोम खरेदीकडे तुलनेने सकारात्मक दृष्टीने पाहिले जाऊ लागले आहे. कंडोम खरेदी करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढल्याचेही अनेक दुकानदार सांगतात. “कंडोम खरेदी करणाऱ्या पुरुषांपेक्षा महिला ग्राहकांची संख्या अधिक असते. अनेक महिला आता ग्राहक कंडोम खरेदी करतात,” असं मुंबईमधील एक औषध विक्रेता सांगतो. “एका व्हायरसमुळे कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीमध्ये एवढ्या झपाट्याने वाढ होईल असा मी कधी विचारही केला नव्हता,” अशी मजेशीर प्रतिक्रियाही मुंबईमधील एका औषध विक्रेत्याने नोंदवली.