करोना व्हायरसमुळे सरकारकडून जनतेला ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहेत. परिणामी, जिओ, एअरटेल या कंपन्यांपाठोपाठ आता व्होडाफोन-आयडियानेही शानदार वर्क फ्रॉम होम प्लॅन आणले आहेत.

व्होडाफोन-आयडियाने वर्क फ्रॉम होम प्लॅनसाठी आपल्या सध्याच्या तीन प्लॅन्समध्ये बदल केला आहे. या तिन्ही प्लॅनमध्ये युजर्सना दुप्पट डेटासह कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचाही फायदा मिळतो. याशिवाय व्होडाफोन प्ले, Zee 5 चे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते. 249 रुपये , 399 रुपये आणि 599 रुपयांचे हे तीन प्लॅन आहेत. जाणून घेऊया या तिन्ही प्लॅन्सबाबत :-

249 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस, 399 रुपयांच्या प्लॅनची वैधता 56 दिवस आणि 599 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. या तिन्ही प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3GB डेटा वापरण्यास मिळेल. आतापर्यंत या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळत होता. तसेच दररोज 100 एसएमएसचाही लाभ घेता येईल.