वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे सध्या अनेकांना सर्दी, ताप आणि मुख्य म्हणजे खोकला होत आहे. अगदी लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच खोकल्याचा त्रास होत आहे. २ दिवसांपूर्वी पडलेला बारीक पाऊस, दुपारी असणारे कडक ऊन आणि रात्री तसेच पहाटेच्या वेळी असणारी थंडी याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येते. दिर्घकाळ खोकून दुखणारा घसा आणि शरीर यामुळे हैराण झालेले अनेक जण आपल्या आजुबाजूला दिसत आहेत. हा खोकला संसर्गजन्य असून तो औषधांनीही लवकर बरा होत नाही. अशावेळी काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आयुर्वेदातील काही उपाय यावर उपयुक्त ठरु शकतात.

हिवाळ्यामध्ये शरीरात साठलेला कफ उन्हामुळे पातळ होतो आणि शरीराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी खोकला येतो. अनेकांना या वातावरणात कोरडा खोकलाही होतो. त्यामुळे उलटीची उबळ आल्यासारखेही होते. अशावेळी काही सोपे उपाय केल्यास त्याचा फायदा होतो.

The ideal right time to consume breakfast, lunch and dinner
दुपारचे जेवण कधी करावे, १२, १ की २? जाणून घ्या नाश्ता, लंच आणि डिनरची योग्य वेळ
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
Kitchen Jugaad how to use lemon to Clean gas
Kitchen Jugaad: गॅसवर लिंबू टाकताच होईल कमाल, पाहा भन्नाट किचन जुगाड व्हिडीओ
Video 5 Minutes Jugaad to Clean Water Tanki At Home Remove All Dirt Stickiness
टाकी रिकामी न करता फक्त ५ मिनिटांत काढून टाका गाळ; आत उतरण्याचीही गरज नाही, पाहा जुगाडू Video

१. कफ पातळ होऊन शरीराबाहेर पडावा यासाठी दिवसभर गरम पाणी प्यावे.

२. दिवसातून ४ वेळा गरम पाण्याने गुळण्या कराव्यात.

३. गवती चहा, आलं, पारिजातकाचे १ पान, तुळशीची पाने, दालचिनी, २ मिरे, १ लवंग असे चार कप पाण्यात घालून उकळावे. हे मिश्रण १ कप होईपर्यंत उकळावे. यामध्ये गूळ घालून गरम असतानाच चहासारखे प्यावे. पहिले ४ दिवस हा काढा दिवसातून २ वेळा घ्यावा. कफ मोकळा होऊ लागल्यानंतर दिवसातून एकदा घ्यावा.

४. पाव चमचा सितोपलादी चूर्ण मधातून चाटावे. यामुळे छातीच्या स्नायूंना ताकद मिळते व कफ मोकळा होण्यास मदत होते.

५. १ चमचा आल्याचा रस आणि १ चमचा मध असे मिश्रण दिवसातून ४ वेळा घ्यावे.

६. आहारात दही, ताक, दूध असे कफ वाढविणारे पदार्थ काही दिवस टाळावेत.

७. संत्री, पेरु अशी फळे खाणे टाळावे. या फळांमुळे आधीपासून असलेला खोकल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ती टाळलेलीच बरी.

८. कोरडा खोकला असेल तर काळ्या मनुका चघळून खाव्या. तसेच खडीसाखरेचा तुकडाही चघळावा. यामुळे खोकला कमी होण्यास मदत होते.

वैद्य लीना बावडेकर,

आयुर्वेदतज्ज्ञ