तुम्हाला जर हृदयरोगापासून टाळायचा असेल तर शाकाहारी व्हाव लागेल. शाकाहारी व्यक्तींमध्ये हृदयरोगाचे प्रमाण मांसाहारीं व्यक्तींपेक्षा एक तृतीयांश कमी असल्याचे संशोधनातून आढळले आहे.
‘युनिर्व्हसिटी ऑफ ऑक्सफर्ड’मधील फ्रान्सिस्को क्रोव यांनी आपल्या सहका-यांसोबत मिळून १९९० च्या सुरुवातीस ब्रिटन आणि स्कॉटलंडमध्ये राहणा-या ४५ हजार लोकांचे नियमित जेवण आणि त्यांची जीवनशैली याची नोंद ठेवण्यास सुरुवात केली. ४५ हजार लोकांपैकी साधारण एक तृतीयांश लोक शाकाहारी जेवण घेत असल्याचे दिसून आले. त्यानंतरच्या ११ ते १२ वर्षात जवळजवळ एक हजाराहून अधिक लोकांना हृद्यरोगामुळे रुग्णालयामध्ये दाखल व्हावे लागल्याचे आढळले. ज्यातील १६९ लोकांचा हृद्याच्या झटक्याने मृत्यू झाला. ‘क्लिनीकल न्यूट्रीशियन’ या अमेरिकन मासिकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
मांसाहारी व्यक्तींच्या तुलनेत शाकाहारी व्यक्तींना हृद्यरोग होण्याचे प्रमाण ३२ टक्के कमी असते. त्याच अनुषंगाने अतिवजन असणा-या शाकाहारी व्यक्तींनाही हृद्यरोग होण्याचे प्रमाण २८ टक्के कमी असते. शाकाहारी जेवण घेण्याने हृद्यरोगाचा धोका कमी संभवतो, असा निष्कर्ष संशोधकांनीव वरील परीक्षणातून काढला आहे.