रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नुकत्याच जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार ज्या ग्राहकांनी डेबिट आणि क्रेडिट कार्ड ऑनलाइन व्यवहारासाठी एकदाही वापरले नसेल तर ऑनलाइन आणि कॉन्टॅक्टलेस ट्रांजेक्शन ही सेवा बंद होणार आहे. यासाठी १६ मार्च २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आरबीआयने फ्रॉडवर आळा घालण्यासाठी सर्वच प्रकारच्या कार्डमध्ये बदल केला आहे. आरबीआयनं मॅग्नेटिक स्ट्राइप असणाऱ्या कार्डला ईएमव्ही चीप असणाऱ्या कार्डमध्ये बदण्यास बँकांना सांगितले होते. त्यानुसार, सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी आपल्या ग्राहकांच्या कार्डमध्ये बदल करण्यास सुरूवात केली आहे.

१६ मार्चपर्यंत एकदाही ऑनलाइन ट्रांजक्शन न केल्यास ऑनलाइन आणि कॉन्टॅक्टलेस ट्रांजेक्शन सेवेला तुम्हाला मुकावं लागणार आहे. कॉन्टॅक्टलेस तंत्रज्ञानाच्या मदतीनं कार्ड होल्डरला ट्रांजक्शनसाठी स्वाइप करण्याची काहीच गरज नाही. याशिवाय १६ मार्चपासून स्थानिक, आंतरराष्ट्रीय, पीओएस ट्रांजेक्शन, एटीएम ट्रांजेक्शन लिमिट ऑन/ऑफ करण्याची सुविधा मिळणार आहे.

दिवसांगणिक होत असलेल्या ऑनलाइन फ्रॉडमधून वाचण्यासाठी आरबीआयनं ही सुविधा सुरू केली आहे. या सुविधेनुसार कार्ड होल्डर स्वत: आपलं डेबिट क्रेडिट कार्ड चालू किंवा बंद करू शकतो. तसेच कार्डच्या स्टेटसमध्ये काही बदल झाल्यास लगेच ग्राहकाला अलर्ट जाणार आहे. ज्या ग्राहकांनी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ऑनलाइन व्यवहारांसाठी एकदाही वापरलेले नाही ते कार्ड लवकरच ब्लॉक /बंद करण्यात येईल. डिजिटल व्यवहारांची सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या वापरासंबंधी नवीन नियम जारी केले आहेत.

नव्या नियमांनुसार, एटीएममधून जास्तीत जास्त किती रक्कम काढली गेली पाहिजे यासंदर्भातील मर्यादा ठरविण्याचा ग्राहकाला पर्याय असणार आहे. तसेच, 24*7 त्यात कितीही वेळा बदल देखील करता येणार आहे. मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीनवरील पर्यायांमधून, बँकेच्या कस्टमर सर्व्हिस क्रमांकावर फोन करून ही सुविधा वापरता येईल