CRPF paramedical staff recruitment 2020 केंद्रीय राखीव पोलिस दलात (CRPF) पॅरामेडिकल स्टाफसह विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज मागण्यात येत आहेत. त्यासाठी crpf.gov.in या संकेतस्थळावर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. नियुक्त करण्यात येणाऱ्या उमेदरवाराला प्रतिमहिना एक लाख ४२ हजार रुपयांपर्यंतचं वेतन मिळणार आहे. करोनामुळे सध्या बेराजगारीचं प्रमाण वाढलं आहे. अशा परिस्थितीत नोकरीची संधी मिळाली आहे.

इच्छूक उमेदरांनी ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज प्रक्रीय २० जूलै पासून सुरू होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची ३१ ऑगस्ट २०२० आहे. या पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. २० डिसेंबर २०२० रोजी लेखी परीक्षा आयोजीत करण्यात आली आहे. नवी दिल्ली, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू, प्रयागराज, अजमेर, नागपुर, मुजफ्फरपूर आणि पल्लीपुरम या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे.

या पंदापासठी निघाली भरती –
इन्स्पेक्टर (डायटीशियन) – एक पद
सब-इन्स्पेक्टर (स्टाफ नर्स) – १७५ पदे
सब-इन्स्पेक्टर (रेडियोग्राफर) – ८ पदे
असिस्टेंट सब-इन्स्पेक्टर (फार्मासिस्ट) – ८४ पदे
असिस्टेंट सब-इन्स्पेक्टर (फीजियोथेरेपिस्ट) – ५ पदे
असिस्टेंट सब-इन्स्पेक्टर (डेंटल टेक्नीशियन) – ४ पदे
असिस्टेंट सब-इन्स्पेक्टर (लॅब टेक्नीशियन) – ६४ पदे
असिस्टेंट सब-इन्स्पेक्टर / इलेक्ट्रो कार्योग्राफी टेक्नीशियन – एक पद
हेड कॉन्स्टेबल (फीजियोथेरेपी / नर्सिंग असिस्टेंट / मेडिक) – ८८ पदे
हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ) – ३ पदे
हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्नीशियन) – 8 पदे
हेड कॉन्स्टेबल (जूनयिर एक्स-रे असिस्टेंट) – ८४ पदे
हेड कॉन्स्टेबल (लैब असिस्टेंट) – ५ पदे
हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) – एक पद
हेड कॉन्स्टेबल (स्टीवर्ड) – तीन पदे
कॉन्स्टेबल (मसालची) – ४ पदे
कॉन्स्टेबल (कुक) – ११६ पदे
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) – १२१ पदे
कॉन्स्टेबल (धोबी) – ५ पदे
कॉन्स्टेबल (W/C) – ३ पदे
कॉन्स्टेबल (टेबल ब्वॉय) – एक पद
हेड कॉन्स्टेबल (वेटनरी) – ३ पदे
एकूण ७८९ पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. प्रत्येक पदांसाठी वेगळी शैक्षणिक अट ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वयाची अटही वेगळी असणार आहे. त्यासाठी crpf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.