News Flash

मानसिक आरोग्यासाठी दही आवश्यक

दररोजच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ असणे आवश्यकच असते. त्यातही दही हा आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक दुग्धजन्य पदार्थ आहे.

शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम दही करते

अमेरिकी शास्त्रज्ञांचे संशोधन

दररोजच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ असणे आवश्यकच असते. त्यातही दही हा आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक दुग्धजन्य पदार्थ आहे. शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम दही करते, पण त्याचबरोबर पचनशक्ती सुधरविण्याचे आणि कोलेस्टेरॉलचा स्तर कमी करण्याचे कामही दही करते. कॅल्शियम आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक प्रमाणात असलेल्या दह्य़ाच्या बाबतीत आता एक नवे संशोधन अमेरिकी शास्त्रज्ञांनी केले आहे. मानसिक आरोग्यासाठी दही आवश्यक असून, दहीमुळे मानसिक तणाव नियंत्रणात येतो, असे महत्त्वपूर्ण संशोधन करण्यात आलेले आहे.
लॉस एंजल्स येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वैद्यकीय संशोधन विभागाने दही आणि त्यांचे फायदे यावर संशोधन केले आहे. दह्य़ाचे नियमित सेवन मानसिक तणाव दूर करतो, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ‘‘दहीमध्ये प्रोबायोटिक तत्त्व असते. जे मेंदूवर परिणाम करते. त्यामुळे मानसिक तणाव नियंत्रण करण्यास मदत होते,’’ असे या शास्त्रज्ञांनी सांगितले.
या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे दह्य़ाचा आणखी फायदा लक्षात आला आहे. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दही आवश्यक असल्याचे या संशोधनातून दिसून येते.

आरोग्यासाठी दह्य़ाचे फायदे
’ पचनशक्ती सुधारते.
’ हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक.
’ रोगप्रतिकारकशक्ती वाढविते.
’ कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्याने दात आणि
हाडे मजबूत करतात.
’ त्वचा तजेलदार राखण्यासाठीही दही आवश्यक.
’ केसांची निगा राखण्यासाठी आवश्यक.
’ केसातील कोंडा दूर करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 1:03 am

Web Title: curd is necessary for mental health
Next Stories
1 लठ्ठपणाची चिंता आयुर्मान घटविते अमेरिकी शास्त्रज्ञांचा दावा
2 गिर्यारोहण करताना बीट जवळ ठेवा 
3 हृदयविकाराचा अंदाज देणारी रक्तचाचणी विकसित
Just Now!
X