News Flash

कडीपत्त्याचे ‘हे’ उपयोग जाणून घ्या

आरोग्यासाठी फायद्याचे

कडीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एकप्रकारचे औषधही आहे. पदार्थांना स्वाद देणारा हा कडीपत्ता आरोग्यासाठी अनेक अंगांनी फायदेशीर असतो. घरात सहज उपलब्ध असणारा आणि बाजारातही अगदी कमी किंमतीत मिळणारा कडीपत्ता नेमका कसा फायदेशीर असतो पाहूयात.

१. जेवणातील स्वाद वाढून जेवण अधिक रुचकर होण्यास मदत होते.

२. जुलाब झाले असता कडीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस घेतल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते. अर्धा कप प्यायला की पोटातल्या वेदना आणि जुलाबाचा वेग नियंत्रणात येण्यास मदत होते.

३. ज्यांना पचनाच्या तक्रारी असतात. वारंवार अजिर्ण होते, जेवल्यावर अस्वस्थ होते. गॅसेसचा त्रास होतो त्यांनी कढीपत्त्याची दहा पाने वाटून त्यात सैंधव मीठ मिसळून ते चटणीसारखे खावे.

४. कडीपत्ता नियमित खाल्ल्याने लवकर म्हातारपण येत नाही.

५. मधुमेही रुग्णांनी दहा बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

६. कडीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून ते तेल डोक्याला लावावे. केस लवकर पांढरे होत नाहीत. तसेच यामुळे केसांची गळती कमी होऊन केस वाढायला मदत होते.

७. सर्दी खोकल्यासारखे त्रास होत असतील तर अशांनी अनुशापोटी कढीपत्त्याची पाने चावून खावीत.

८. यकृताच्या आजारात कडीपत्ता अतिशय उपयुक्त असतो. कोणत्याही प्रकारच्या काविळीत कडीपत्ता चावून खाणे हा साधा घरगुती उपाय आहे.

९. पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही. उलटी आणि मळमळ थांबते.

१०. डोळ्यांचे आरोग्या उत्तम राहण्यासाठीही कडीपत्ता फायदेशीर असतो. त्यामुळे आहारात कडीपत्त्याचा समावेश आवर्जून करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 3:18 pm

Web Title: curry leaves benefits of kadipatta useful for good health
Next Stories
1 सफाईकाम केल्याने महिलांच्या श्वसनक्षमतेवर परिणाम
2 दही हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
3 प्रवासात आरोग्य कसे राखाल?
Just Now!
X