सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता जाते. सीताफळाला संस्कृतमध्ये ग्रीष्मजा, िहदीमध्ये सीताफळ, इंग्रजीमध्ये कस्टर्ड अॅपल तर शास्त्रीय भाषेत आमोना रेटीकूलहा असे म्हणतात.

औषधी गुणधर्म-
सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व असते. तसेच त्यात आद्र्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नसíगक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे.

satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Former MLA Narayanarao Gavankar withdraws from Akola Lok Sabha constituency
माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची माघार, अकोला भाजपमधील बंड…
cm eknath shinde hatkanangale lok sabha marathi news
हातकणंगलेच्या उमेदवारीवरून शिंदेसेनेतील मतभेद चव्हाट्यावर; उमेदवारीत बदल नाही, माने यांचा विश्वास

उपयोग –

  • सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुला-मुलींना सीताफळ दिल्यास त्यांची वाढ उत्तम रीतीने होऊन शरीर सुदृढ बनते.
  • स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे. बाळंतपणानंतर तसेच चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही झीज भरून येते. यासाठी सीताफळ सत्त्व हे औषध उत्तम आहे. याचा वापर वर्षभर करता येतो.
  • आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.
  • कृश व्यक्तीने वजन वाढत नसेल किंवा आजारपणानंतर वजन घटले असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने क्षीण झालेल्या मांसपेशीची वृद्धी होते व वजन वाढीस लागते.
  • ज्यांच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तसेच ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल. छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे.
  • आम्लपित्त, अरुची, शरीरात उष्णता जाणवणे, छातीत व पोटात जळजळ होणे ही लक्षणे जाणवत असल्यास सीताफळ खावे.
  • सहसा सीताफळ हे दुपारच्या वेळेमध्ये खावे.
  • मुच्र्छा आली असल्यास सीताफळाची पाने वाटून त्यांचा रस काढावा व रसाचे थेंब नाकात टाकावेत. रुग्ण शुद्धीवर येतो.
  • सीताफळांच्या बियांची पूड रात्री झोपताना केसांना चोळून लावल्याने उवा मरतात व डोक्यातील कोंडाही जातो. बियांच्या या पूडमध्ये शिकेकाई घालून केस धुतल्यास केस स्वच्छ व चमकदार होतात व उवा व लिखाही होत नाहीत.
  • सहसा सीताफळ हे जेवणानंतर १ ते २ तासांनी खावे. सीताफळाच्या गरापासून सरबत बनविता येते. तसेच सीताफळाचे आइसक्रीमही करता येते.
  • सीताफळाची पाने वाटून त्याचा रस करावा व यामध्ये थोडे सैंधव घालून त्याचे पोटीस बनवावे हे पोटीस न पिकलेल्या गळवावर(बेंड) लावल्यावर गळू लवकर पिकते तसेच जखमेवर बांधल्यास जखमेतील घाण निघून जाऊन जखम स्वच्छ होते.
  • अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस थोडय़ा थोडय़ा अंतराने पिण्यास दय़ावा.

सावधानता –

ज्यांना सर्दी-खोकला झाला आहे, अशा व्यक्तींनी सीताफळ खाऊ नये. तसेच ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनीही सीताफळ खाऊ नये. अतिप्रमाणात सीताफळ खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे बठेकाम करणाऱ्यांनी तसेच स्थूलता असणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावे. सीताफळाच्या बियांची पूड डोक्यावर लावताना ही पूड डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्यावी. कारण याने डोळ्यांची आग होऊन विकार निर्माण होऊ शकतात.