News Flash

चालणे, सायकलिंगचा फायदा मधुमेही रुग्णांना

दिवसभरात जे लोक आपल्या मर्यादेच्या आत किमान शारीरिक व्यायाम करतात

| October 20, 2016 01:19 am

दिवसभरात जे लोक आपल्या मर्यादेच्या आत किमान शारीरिक व्यायाम करतात, त्यांना ‘टाइप २’चा मधुमेह न होण्याची शक्यता ही ४० टक्के असल्याचा दावा नवीन संशोधनातून करण्यात आला आहे.

या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, आठवडय़ातून किमान १५० मिनिटे उत्साहाने चालण्याने किंवा सायकल चालवण्याने एखाद्या व्यक्तीला टाइप २चा मधुमेह होण्याची शक्यता २६ टक्क्यांनी कमी होत युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन (यूसीएल) आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी, युनायटेड किंगडम (युके)च्या संशोधकांनी म्हटले आहे.

या वेळी संशोधकांनी उत्साह आणणाऱ्या आणि शारीरिक व्यायामाला कारणीभूत असणारे खेळ म्हणजेच वेगाने चालणे, सायकल चालवणे किंवा दुहेरी टेनिस यांसारख्या खेळांना अधिक प्राधान्य देण्याचे सुचविले आहे.

२०१२ सालच्या इंग्लंडमधील आरोग्य सर्वेक्षणानुसार, वयस्कांपैकी अनेकांकडून याचे पालन होत नसून सर्वेक्षणानुसार कोणत्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम हा आरोग्याला हितकारकच असतो. तसेच जे लोक आपल्या मर्यादांपेक्षा त्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतात ते अधिक हितकारक असल्याचेही म्हटले आहे. या वेळी संशोधकांनी अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोप येथील संकलित माहितीचेही विश्लेषण केले. यापूर्वीच्या संशोधनात नेहमीचा आहार आणि कवायतींमुळे शारीरिक आजारांना वेगळे ठेवणे कठीण जात होते, पण नवसंशोधनातून जागतिक स्तरावर पसरत असलेल्या टाइप २ च्या मधुमेहावर परिणामकारक असल्याचे दिसून आल्याचे यूसीएलचे अ‍ॅण्ड्रे स्मित यांनी म्हटले आहे.  हे संशोधन डायबेटोलोजिया या जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2016 1:19 am

Web Title: cycling good for health
Next Stories
1 संधिवातामुळे हृदयविकाराचा धोका
2 जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या अधिक!
3 झिकाचा संसर्ग एका व्यक्तीस एकदाच
Just Now!
X